शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

राष्ट्रीय पातळीवर दंडारकला जोपासणारे उद्धवराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:44 IST

पोटासाठी सारेच झटतात परंतु कलेसाठी जीवनातील सुख बाजूला सारुन झाडीपट्टीतील लोककला राष्टÑीय पातळीवर जिवंत ठेवणाºया उद्धवरावांच्या कार्यकर्तृत्वाला सारेच सलाम करीत आहेत.

ठळक मुद्दे आतापर्यंत साकारले साडेतीनशे पात्र : पांरपारिक कलेची जोपसना

हितेश रहांगडाले।लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : पोटासाठी सारेच झटतात परंतु कलेसाठी जीवनातील सुख बाजूला सारुन झाडीपट्टीतील लोककला राष्टÑीय पातळीवर जिवंत ठेवणाºया उद्धवरावांच्या कार्यकर्तृत्वाला सारेच सलाम करीत आहेत.दंडार हा लोककला प्रकार ज्यांच्या रक्तातच भिनलेला आहे असे उद्धवराव टेंभरे. तिरोडा तालुक्यातील भजेपार या दुर्गम भागातील वस्तीतील रहिवासी, वडील व समाजाकडून दंडार कलेचा मिळालेला वारसा आज त्यांनी सर्वोच्च शिखरावर नेलेला आहे. अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच दंडार या कलाप्रकारात निपुण उद्धवराव व्यवसायाने ज्ञानादानाचे कार्य करीत आहेत. परंतु शासकीय नोकरी मिळाली म्हणून शहराकडे धाव न घेता गावातच राहून ते आजही दंडारीला जपत आहेत. विक्तुबाबा दंडार मंडळाच्या नावाने दंडार कला जोपासणाºया उद्धवरावानी जिल्हा किंवा राज्य पातळीवरच नव्हे तर राष्टÑीय पातळीवरही दंडार कलेस जीवंत ठेवले आहे. वयाची साठी जवळ आली असतानाही ‘पहाडी’ आवाजाचा धनी असलेला हा कलावंत आजही तितक्याच स्फूर्तीने दंडारीसाठी झटत आहे. ‘दंडार’ या कला प्रकारातून त्यांनी अनेक विषयांवर जनजागृती केली आहे. निर्मलग्राम, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, नोटबंदी, यासारख्या ज्वलंत विषयासह पुरातन कालीन प्रथा, संस्कृती यांना जपण्यावरही त्यांचा भर आहे. उद्धवराव यांचा हार्मोनियम, कॅशिओ वादनासह अभिनय, गीतगायन, जसजागरण, भजन, लेखन सारख्या अनेक विषयावर प्रभुत्व आहे.आजतागायत सुमारे २७६ हून अधिक भूमिका त्यांनी साकारल्या असून ११३ ठिकाणी विविध कला स्पर्धेत सहभाग घेत मंडळाला लाखोंची बक्षीसे मिळवून दिली आहेत. झाडीपट्टी पर्यटन लोककला महोत्सव व लोककला साहित्य संमेलनात त्यांना राष्टÑीय पातळीवर गौरविण्यात आले आहे. मंडई, जलसा, जागरण, भजनसंध्या, नवटंकी ड्रामा, मराठी नाटक यासह दंडार कलेवर विशेष भर देणाºया उद्धवरावांना त्यांच्या मंडळाची, कुटुंबियाची व विद्यालयाचे प्राचार्य ए.डी. पटले यांचे नेहमी सहकार्य व प्रोत्साहन मिळाले आहे. केवळ शासकीय नोकरी करुन स्वत:चे अस्तित्व मर्यादित न ठेवता ‘दंडार’ कलेसाठी आयुष्य झटणाºया या तडफदार व परिश्रमी कलावंतावर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.