शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

तिरोडा बसस्थानकावरून दागिणे चोरणाऱ्या आंतर जिल्हा चोरीच्या टोळीतील दोन महिलांना अटक  

By नरेश रहिले | Updated: April 11, 2024 19:36 IST

तिरोडा बसस्थानकावर बसमध्ये चढतांना भंडाराच्या खात रोड वरील महिलेच्या बॅगमधून ४ लाखाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना तिरोडा पोलिसांनी १३ दिवसात अटक केली.

गोंदिया: तिरोडा बसस्थानकावर बसमध्ये चढतांना भंडाराच्या खात रोड वरील महिलेच्या बॅगमधून ४ लाखाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना तिरोडा पोलिसांनी १३ दिवसात अटक केली. त्या महिलांजवळून चोरी केलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यात आला. त्या महिलांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. भंडारा जिल्ह्याच्या खात रोड, तुलसी नगर केसलवाडा येथील सिमा किशोर ठाकरे (४०) ह्या २८ मार्च रोजी बसने प्रवास करीत असताना त्यांच्याकडे असलेल्या हँन्डबॅग मधून बस स्टॉप तिरोडा येथे त्या बसवर चढत असतांना दोन अनोळखी महीलांनी त्यांच्या बॅगमधील ३ लाख ९५ हजार रुपये किंमतीचे ७.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख १५ हजार रुपये हा माल चोरून नेला होता.

या घटनेसंदर्भात तिरोडा पाे भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, प्रभारी अधिकारी देविदास कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्याे लोकांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाने बस स्टँड तिरोडा, बस स्टॅन्ड तुमसर, बस स्टॅन्ड भंडारा येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. गोंदिया येथील सायबर सेल यांच्या मदतीने मोठ्या शिताफीने तपास करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत आंतर जिल्हा चोरी करणारे महिलांची टोळीचा शोध घेतला. या प्रकरणात आरोपी सोनु रितेश भिसे (३०) रा. सतरापुर/कन्हान ता.पारशिवनी जि.नागपूर व सिमा विजय नाडे (५३) रा.रामेश्वरीटोली, रिंग रोड, अजनी नाका नागपूर जि.नागपूर यांना अटक करून त्यांच्या जवळून चोरीला गेलेले सर्व दागिणे हस्तगत केले. चोरट्या महिलांकडून असे दागिणे हस्तगतआरोपी सोनु रितेश भिसे (३०) रा.सतरापुर कन्हान ता.पारशिवनी जि.नागपूर हिच्या घरुन एक लाख २ हजार रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ३२ हजार रूपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी, १६ हजार रूपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, २० हजार रूपये किंमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याची कानवेल, ७ हजार रूपये किंमतीची सोन्याची आंगठी, १३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे रिंग १२ हजार रूपये किंमतीचा मंगळसूत्र, ९ हजार रूपये रोख असा एकूण २ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर आरोपी सिमा विजय नाडे हिच्या जवळून ३९ हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी, ४५ हजार रूपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, २३ हजार रूपये किंमतीची सोन्याची आंगठी, १२ हजार रूपये किंमतीची सोन्याची आंगठी, ५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पेंडाल, २४ हजार रूपये किंमतीची सोन्याची आंगठी, १० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, ४ हजार रूपये किंमतीचा सोन्याचे डोरला, ९ हजार ५०० रूपये किंमतीची सोन्याची मोती असलेली नथ, ६ हजार रूपये रोख असा एक लाख ८६ हजार ५०० रूपयाचा माल हस्तगत केला. दोघींना न्यायालयीन कोठडीदोन्ही आरोपींना आरोपींना सतरापूर/कन्हाण, ता.पारशिवनी जिल्हा नागपूर येथून अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्या दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई तिरोडा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चिंरजीव दलालवाड, सहाय्यक फौजदार मनोहर अंबुले, पोलीस हवालदार दिपक खांडेकर, पोलीस शिपाई सुर्यकांत खराबे, निलेश ठाकरे, नंदा बडवाईक, सोनाली डहारे, सायबर सेल गोंदिया येथील पोलीस हवालदार दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, प्रभाकर पालांदुरकर, रोशन येरने यांनी केली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया