शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोटारसायकल चोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:12 IST

रेल्वेप्रवाश्यांच्या वाहनांना चोरणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने शुक्रवारी (दि.१२) पकडले. त्यांच्या जवळून सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देरेल्वे सुक्षा बलची कारवाई : चोरीच्या सहा मोटारसायकल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वेप्रवाश्यांच्या वाहनांना चोरणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने शुक्रवारी (दि.१२) पकडले. त्यांच्या जवळून सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.शहरातील मालवीय वॉर्डातील प्रीतम प्रेमचंद झाडे (२७) हे आपल्या नातेवाईकांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी १० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आले होते. त्यांची एमएच ३५-क्यू ९१३० ही मोटारसायकल स्थानकाबाहेर ठेवली होती. ती बेपत्ता होताच त्यांनी रेल्वे सुरक्षा बलला याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बालच्या जवानांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले व चौकशी सुरू केली असता शुक्रवारी (दि.१२) दुपारी श्री टॉकीजजवळील दारूच्या दुकानाजवळ त्याच क्रमांकाच्या मोटारसायकलला धक्का मारत दोन इसम घेऊन जात होते. त्यांना पकडून विचारपूस केल्यावर ते रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम अंभोरा येथील रहिवासी असून दिनेश रेखलाल चौधरी (३०) व सोमेश चिंतामन बागडे (३४) असे त्यांचे नाव असल्याचे पुढे आले. त्यांनी ती मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. सोबतच नागपूर व गोंदिया येथून आणखी दोन मोटारसायकल चोरल्याची कबुली त्यांनी दिली.रेल्वे स्टेशन वरून मोटारसायकल चोरून ते दारू दुकानाजवळ ठेवत व संधी मिळताच नेत होते. चौधरी व बागडे यांनी पोलिसांच्या चमूला दारू दुकानाजवळ जाऊन त्या मोटारसायकल दाखविल्या. तेथे एमएच ३१-बीयू ७०५० व एक विना क्रमांकाची मोटारसायकल आढळली. या घटनेची तक्रार रेल्वे पोलिसांत करण्यात आली. झाडे यांनी आपल्या मोटरसायकलला ओळखले. त्यानंतर त्या दोघांची कसून चौकशी केल्यावर आणखी तीन मोटारसायकलची माहिती त्यांनी दिली. सदर मोटारसायकल दिनेश चौधरी यांच्या घरी लपवून ठेवल्या होत्या. त्या सहाही मोटारसायकलला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. यापूर्वीही रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी १९ मोटारसाकल जप्त केल्या होत्या.न्यायालयातून सायकल लंपासगोंदिया : येथील जिल्हा न्यायालयात कर्मचाºयाने नेहमीप्रमाणे आपली सायकल उभी केली असता अज्ञात आरोपी चोरून नेत असताना सीसीटिव्ही कॅमेरात आढळले. २ एप्रिलला सकाळी १०.१५ वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.