लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शनिवारी (दि.२५) आणखी दोन कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा १८ वर पोहचला आहे. तर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले.जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या दोन कोरोना बाधितांमध्ये गोंदिया सिव्हिल लाईन येथील एका रुग्णाचा समावेश असून तो बिलासपूरवरुन आला आहे. तर दुसरा रुग्ण हा तिरोडा नेहरु वॉर्ड येथील रहिवासी आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढ आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७९९५ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.यापैकी २४४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ७५७० स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले. आतापर्यंत २१७ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. ९२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व जे कोरोना संशियत रुग्ण आहेत त्यांचा रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील ११५३ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यापैकी सहा जणांचे नमुने अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १४५ आणि गृह विलगिकरणात १००० अशा एकूण ११४५ व्यक्ती विलगिकरणात आहे.जिल्ह्यात आता २७ कंटेन्मेंट झोनजिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार, फतेहपूर,डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, कुंभारेनगर व सिव्हिल लाईन (गोंदिया), सालेकसा तालुका तालुक्यातील पाऊलदौना, पाथरी, शारदानगर व रामाटोला, तिरोडा तालुक्यातील तिरोडा (सुभाष वार्ड), बेरडीपार, बेलाटी खुर्द,वीर सावरकर वार्ड, भुतनाथ वार्ड, किल्ला वार्ड आणि गराडा, गोरेगाव तालुक्यातील भडांगा, घोटी व डव्वा, सडक अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवणी व पाटेकुर्रा आणि देवरी तालुक्यातील देवरी येथील वार्ड क्रमांक ८ आणि आखरीटोल्याचा समावेश आहे.
जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST
जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या दोन कोरोना बाधितांमध्ये गोंदिया सिव्हिल लाईन येथील एका रुग्णाचा समावेश असून तो बिलासपूरवरुन आला आहे. तर दुसरा रुग्ण हा तिरोडा नेहरु वॉर्ड येथील रहिवासी आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढ आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे.
जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधितांची भर
ठळक मुद्देदोन जण झाले कोरोनामुक्त । ७५७० नमुने कोरोना निगेटिव्ह