शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

घराला लागलेल्या आगीत दोन लाख रुपये जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 21:35 IST

शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्यासह रोख दोन लाख रुपये जळून राख झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) रात्री ८ वाजताच्या सुमारास सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे घडली. यामुळे चार लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देसाखरीटोला (सातगाव) येथील घटना : चार लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्यासह रोख दोन लाख रुपये जळून राख झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) रात्री ८ वाजताच्या सुमारास सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे घडली. यामुळे चार लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथील शकुंतला राधेलाल शिवणकर यांच्या घराला शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागली. काहीच वेळात आगीने रौद्ररुप धारण केल्याने घरातील संपूर्ण साहित्यासह घरात असलेले दोन लाख रुपये आगीत जळून राख झाले. त्यामुुळे शिवणकर यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. आग लागली त्यावेळी शिवणकर यांच्या घरात कुणीही नव्हते. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. मोलमजुरी व भांडीकुंडी करुन आपला उदरनिर्वाह करणारी शकुंतला आपल्या दोन मुल व एका मुलीसोबत येथे राहात होते. मुलांना चांगले शिक्षण देता यावे, म्हणून प्रसंगी उधार उसणवारी करून संसाराचा गाडा चालवित आहे. मुलगी नागपूरला एका मोठ्या दवाखान्यात नर्सचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्यासाठी शकुंतलाने उसणवारीवर दोन लाख रुपये आणले होते. हे पैसे मुलीला देण्यासाठी ती रविवारी (दि.२०) नागपूरला जाणार होती. मात्र शनिवारी रात्रीच्या सुमारास घराला लागलेल्या आगीत दोन लाख रुपयांची रोख व सोन्या-चांदीचे दागिने जळून राख झाले. आगीमध्ये घरातील कपडे, अन्नधान्य, टीव्ही तसेच इतर साहित्य जळाल्याने ४ लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी बागडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. घर पक्के स्लॅबचे असल्याने आग बाहेर पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शकुंतला शिवणकर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शासनाने त्यांना अर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :fireआग