लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : रस्ता ओलांडत असलेल्या हरणाला भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात हरणासह दुचाकीस्वार पोलीस जवान ठार झाला असून दुसरा जवान जखमी आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी ८ वाजता दरम्यान गोंदिया-आमगाव मार्गावरील मानेगाव येथे घडली. मृत जवानाचे नाव राजेंद्र संतु दमाहे (३२, बक्कल नंबर ३३२, रा. नागरा-कटंगी) असे आहे.राजेंद्र दमाहे व नंदू भाऊलाल खरे (२८) बक्कल नंबर १०२ हे दोघे सशस्त्र दूर क्षेत्र बोंडे येथे कार्यरत आहेत. गुरूवारी (दि.२८) कारंजा पोलीस मुख्यालयात कर्मचाºयांची कार्यशाळा असल्याने ते कार्यशाळेत सहभागी झाले होते. शुक्रवारी (दि.२९) त्यांना एओपी बोंडे येथे हजर व्हायचे असल्याने ते बिना क्रमांकाच्या दुचाकीने बोंडेकडे जात होते. भरधाव वेगात असलेली दुचाकी मानेगाव येथील वळणावर रस्ता ओलांडत असलेल्या हरणाला धडकली.यात दुचाकीचालक राजेंद्रचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला नंदू गंभीर आहे. अपघात घडल्यानंतर त्या दोघांना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीकेने येथील मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरने राजेंद्रला मृत घोषित केले. नंदूला उपचारासाठी केएमजे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.शिवाय धडकेत जखमी हरणाचाही मृत्यू झाला. या घटनेची नोंद आमगाव पोलिसांनी घेतली आहे. वनाधिकाºयांनी या संदर्भात पंचनामा केला आहे.
दुचाकी अपघातात जवान ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:58 IST
रस्ता ओलांडत असलेल्या हरणाला भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात हरणासह दुचाकीस्वार पोलीस जवान ठार झाला असून दुसरा जवान जखमी आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी ८ वाजता दरम्यान गोंदिया-आमगाव मार्गावरील मानेगाव येथे घडली.
दुचाकी अपघातात जवान ठार
ठळक मुद्देहरणाला दुचाकी धडकली : मानेगाव वळणावरील घटना