शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; लॉकडाऊनमुळे मजुरांचा दोनशे कि.मी.चा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:59 IST

मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील मजुरांवर संकट रेल्वेरुळांवरून प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने २१ दिवसांच्या लॉक डाऊन केला आहे. परिणामी सर्वच रेल्वेसह सर्वच वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे मजुरीसाठी दुसऱ्या शहर व राज्यात गेलेल्या मजुरांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला.मध्यप्रदेशातील मंडला बैयर येथील १३ मजूर मुंबई येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. मात्र कोरोनामुळे तेथील काम बंद झाल्याने त्यांना संबंधित ठेकेदाराने गावाकडे परत जाण्यास सांगितले. त्यामुळे हे सर्व मजूर २४ मार्च रोजी गोंदिया येथे कसे तरी पोहचले. मात्र यानंतर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन व राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. तर रेल्वेसह इतर वाहतूक ठप्प झाली. खासगी वाहने सुध्दा बंद असल्याने त्यांना मंडला बैयर येथे जाण्याची अडचण निर्माण झाली. त्यांनी गोंदिया येथे दोन दिवस कसे बसे काढले. मात्र आता त्यांच्याकडील पैसे संपल्याने आणि जेवणाची देखील सोय नसल्याने उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान शुक्रवारी पहाटे ४ वाजताच या सर्व १३ मजुरांनी पायीच आपल्या गावाला जाण्याचा निर्धार केला. यानंतर गोंदियाहून बालाघाटकडे जाणाºया रेल्वे मार्गाने  त्यांनी आपल्या सामानासह गोंदिया ते मंडला बैयर या दोनशे किमीच्या पायी प्रवासाला सुरूवात केली. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय असून यात काही लहान मुलांचा सुध्दा समावेश आहे.लॉकडाऊनमुळे सध्या विविध राज्यात कामासाठी गेलेले मजूर आपल्या गावाकडे परतत असताना अनेक ठिकाणी फसले आहे. मात्र शासनाने अद्यापही अशा लोकांची कुठलीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे या मजुरांना उपाशी तापाशी आणि पायी आपले गाव गाठण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस