शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीच्या दोन्ही मुली जि.प.च्या शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:52 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ‘झोलबा पाटलाचा वाडा’ अशी अनेक वर्षांपासून लोकांची समज आहे.

इतरांसाठी आदर्श : जिल्ह्यासाठी प्रेरणादायी पाऊललोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ‘झोलबा पाटलाचा वाडा’ अशी अनेक वर्षांपासून लोकांची समज आहे. त्यामुळे स्वत: जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये शिक्षण देतात. मात्र आता जि.प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी पाऊल उचलले आहे. त्यात सर्वांसाठी आदर्श म्हणून स्वत: एका जि.प. सभापती यांनी आपल्या दोन मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविले.मागील दोन तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवून लोकांमध्ये रुजलेला भ्रम तोडण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. परंतु याचा प्रत्यक्षात काही प्रभाव पडला नाही आणि कान्व्हेंट संस्कृतीच्या जाळ्यात पालक वर्ग दिवसेंदिवस फसत चालला. मात्र अधिकारी, पदाधिकारी वेळोवेळी विचारमंथन करून जि.प. शाळांकडे पालकांचा कल वाढविण्यासाठी पाऊल उचलताना दिसून आले. यात स्वत: जि.प.च्या शिक्षकाने आपल्या मुलांना जि.प.च्याच शाळेत पाठवावे, अशीही आग्रही भूमिका घेण्याचे ठरविले. परंतु सुरुवात कोणी करायची आणि कोठून करायची, असा प्रश्न नेहमी उद्भवत राहीला. अशा परिस्थतीत जिल्हा परिषद गोंदियाचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांनी आपल्या दोन्ही मुलींना जि.प.च्या शाळेत पाठवून सगळ्यांनाच सर्वांसमोर आदर्श ठेवला. आता आपणही जि.प. च्या शाळेत आपल्या मुलांना पाठविले पाहिजे, यावर विचार करण्यास सर्वांना भाग पाडले आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या दोन्ही मुली जि.प. च्या शाळेत जावून हुशार बनत आहेत. भविष्यात काहीतरी करण्याच्या जिद्दीने अभ्यास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. यामुळे वडगाये हेसुद्धा स्वत:ला समाधानी मानत आहेत.सभापती पदावर मागील दोन वर्षांपासून ते पदासिन आहे. सभापती वडगाये यांची मोठी मुलगी प्रणिता आठवीत गेली असून लहान मुलगी विद्या तिसऱ्या वर्गात आहे. दोन्ही मुली आनंदाने जि.प.च्या शाळेत शिकत आहेत. वडगाये सालेकसा जवळील सोनारटोला गावातील रहिवासी आहेत. केव्हाही कुठेही लोकांच्या सुखदु:खात सहभागी होण्यासाठी नेहमी जातात. त्यामुळे पक्षाचे असो की विरोधी पक्षाचे असोत, प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. दोन्ही मुली हुशार आहेत, तरी त्यांनी त्यांना कान्व्हेंटमध्ये न पाठविता जि.प.शाळेत पाठविण्याचा निर्धार केला.शाळेत प्रशिक्षित शिक्षकांसह इतर सोईसुविधाजि.प.च्या शाळेत सोईसुविधा पुरेशा असून सतत नवनवीन उपक्रम शासनाकडून राबविले जातात. जि.प. शाळेचे शिक्षक प्रशिक्षित असून वेळोवेळी त्यांना गरजेनुसार प्रशिक्षण मिळत असते. त्यामुळे नवसृजनात्मक बाबीसुद्धा जि.प.च्या शाळेत घडतात. सध्या सुरू असलेले ज्ञानरचनात्मक, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजिटल शाळा इत्यादी नवोपक्रमांमुळे मुलांच्या ज्ञानात भर पडत आहे. एवढेच नाही तर अभ्यासाची आवडसुद्धा वाढत आहे. अशात जि.प.च्या शाळेत मुलांना शिकविणे त्यांच्या भविष्यासाठी जास्त हितकारक आहे, असे सभापती देवराज वडगाये यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धीक वाढीसाठी पोषक वातावरण आहे. तसेच जि.प.च्या शाळेत विद्यार्थ्यांच्या मनावर कोणतेही दडपण राहत नाही.- देवराज वडगायेसभापती, जि.प. गोंदिया