लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोनाने मृत्यू होण्याच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी (दि.३०) आमगाव तालुक्यातील दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर २६ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा १३९३ वर पोहचला आहे. तर ४५ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने जिल्हावासीयांना थोडासा दिलासा मिळाला आहे.रविवारी आढळलेल्या २६ कोरोना बाधितांमध्ये १५ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहेत. देशबंधू वार्ड सहा रुग्ण, रिंगरोड, शास्त्री वार्ड, श्रीनगर, गांधी चौक, कुडवा, न्यू लक्ष्मीनगर व कन्हारटोली येथील प्रत्येकी एक रुग्ण व दोन रु ग्ण गोंदिया येथील इतर भागातील आहे. तिरोडा येथील शहीद मिश्रा वार्ड व संत सज्जन वार्ड येथील प्रत्येकी एक रुग्ण, गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव व गोरेगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण, आमगाव तालुक्यातील बिरसी, लांजी रोड आमगाव व चिरचाळबांध येथील प्रत्येकी एक रुग्ण, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दिनकर नगर येथील दोन रुग्ण, बाहेर राज्य व जिल्ह्यातील मध्यप्रदेशातील बालाघाट व भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आमगाव तालुक्यातील दोन कोरोना बाधितांचा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून यामध्ये एक रूग्ण चिरचाळबांध आणि एक आमगाव येथील आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये गोंदिया तालुका ८, तिरोडा तालुका ७ रुग्ण, आमगाव तालुका ३ आणि सडक तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.१६ हजार ४०५ स्वॅब नमुन्यांची तपासणीकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १६ हजार ४०५ स्वॅब नमुने गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १४ हजार ३६१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १३९३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.४५४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. ४६५ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.आतापर्यंत ९२० कोरोना बाधित कोरोनामुक्तजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३९३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ९२० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १६ हजार ४०५ स्वॅब नमुने गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १४ हजार ३६१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १३९३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.४५४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. ४६५ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.
जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
ठळक मुद्दे२६ कोरोना बाधितांची भर : ४५ कोरोना बाधितांची कोरोनावर मात