शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचे घर जाळणारे दोन भाऊ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:36 IST

वडिलांच्या नावाने असलेले राहते घर आम्हा दोघा भावाच्या नावाने करुन दे असा तगादा लावून जन्मदात्या वडिलाला मारहाण करण्याची धमकी देवून घर जाळल्याची घटना बुधवारी (दि.२६) रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा येथे घडली.

ठळक मुद्देस्वत:च्या नावावर घर न करुन दिल्याने काढला वचपा : माहुरकुडा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वडिलांच्या नावाने असलेले राहते घर आम्हा दोघा भावाच्या नावाने करुन दे असा तगादा लावून जन्मदात्या वडिलाला मारहाण करण्याची धमकी देवून घर जाळल्याची घटना बुधवारी (दि.२६) रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा येथे घडली. दरम्यान वडिलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घर जाळणाऱ्या दोन्ही भावांना अटक केली.प्राप्त माहितीनुसार माहुरकुडा येथील पुनीराम मुकुंदा कोल्हे हे पत्नी रेखा व मोठा मुलगा रुषी, सून नलीनी, मुलगी खुशी, लहान मुलगा हुमेश हे सर्व वडीलाच्या नावाने असलेल्या घरामध्ये एकत्र राहतात. लहान मुलाची पत्नी प्रियंका ही चार पाच महिन्यांपासून माहेरी राहत आहे. एकत्र राहत असलेले दोन्ही मुले राहते घर व शेतजमीन आमच्या नावाने करुन दे असा तगादा वारंवार वडील पुनीराम यांच्याकडे लावीत होते.बुधवारला (दि.२६) दुपारी ४ वाजता वडील अर्जुनी-मोरगाववरुन गावाला परत आले. त्या वेळी मोठा मुलगा व सुनेचे भांडण सुरु होते. मुलगा व सुनेचे भांडण सुरु असताना वडीलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोठ्या मुलाने तुझ्यामुळेच आमचे भांडण होत आहेत. तुझ्या नावाने असलेले घर आमच्या नावाने करुन दे, दुसरी गाडी घेऊन दे असा मोठा भाऊ बोलत असताना लहान भावाने सुध्दा मोठ्या भावाच्या मागणीला प्रतिसाद दिला. शाब्दीक बोलणे सुरु असताना मोठ्या मुलाने स्वत:ची मुलगी खुशीला हातात पकडून माझ्या नावाने घर करुन दे, नाही तर खुशीला जमिनीवर आपटतो अशी धमकी वडीलाला दिली. वडीलांनी नातनीला सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन्ही मुलांनी वडील पुनीरामला जीवे मारण्याची धमकी दिली.या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पुनीराम यांनी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. दरम्यान तक्रार करुन गावाकडे परत येत असताना दोन्ही मुलांनी घरावर डिझेल टाकून व तणसीच्या सहाय्याने आग लावून जाळले.पुनीराम कोल्हे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रुषीकुमार कोल्हे,हुमेशकुमार कोल्हे या दोघाही भावांविरुध्द भांदवीच्या कलम ४३६, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा करुन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक माणीक खरकाटे करीत आहेत.

टॅग्स :fireआग