शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

दोघा लाचखोर लाईनमनला कारावास

By admin | Updated: March 11, 2016 02:23 IST

वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्याप्रकरणी लाच स्वीकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेल्या दोघा लाईनमेनला न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

गोंदिया : वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्याप्रकरणी लाच स्वीकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेल्या दोघा लाईनमेनला न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सन २००४ मधील या प्रकरणात न्यायालयाने गुरूवारी (दि.१०) निर्णय सुनावला आहे. सविस्तर असे की, तक्रारदार (रा.बलमाटोला) हे शेतकरी असून आरोपी लाईनमेन सुनिल अमृत घरडे (२२) व बाळा मारोती तांडेकर (५४) यांनी त्यांच्या शेतातील पाणी देण्याचे स्टार्टर व तार नेले होते. दोघांनी तक्रारदारास साहीत्य परत करण्यासाठी तसेच वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी एक हजार ४०० रूपयांची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने ६ नोव्हेंबर २००४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या आधारे पथकाने ८ नोव्हेंबर रोजी वीज वितरण कंपनीच्या काटी येथील कार्यालयात सापळा लावून दोघा लाईनमेनला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. दोघांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ७,१२,१३(१)(ड) सहकलम १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोघांविरूद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. प्रकरणी गुरूवारी (दि.१०) विशेष न्यायाधीश एस.आर.त्रिवेदी यांनी निर्णय सुनावत कलम ७ अंतर्गत पाच वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय कलम १३ (१)(ड) अंतर्गत दोघांना पाच वर्षांचा कारावास व प्रत्येकी दोन हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारवासाची शिक्षा सुनावली आहे. (शहर प्रतिनिधी)