शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 20:43 IST

गोंदिया जिल्ह्यातील जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वनप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. अशात जंगलातून पाण्याच्या शोधात भटकत आलेली दोन अस्वले विहिरीत पडल्याची घटना तालुक्यातील जांभळी येथे सोमवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देचार तासांच्या मोहीमेनंतर प्रयत्न फळालाजांभळी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यातील जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वनप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. अशात जंगलातून पाण्याच्या शोधात भटकत आलेली दोन अस्वले विहिरीत पडल्याची घटना तालुक्यातील जांभळी येथे सोमवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान वन्यजीवव आणि वनविभागाच्या चमूने चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून विहिरीत पडलेल्या दोन्ही अस्वलांना सुखरुपणे बाहेर काढले.मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रस्ते मानवरहित झाले आहेत. तसेच रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ सुध्दा कमी झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. आठ दिवसांपूर्वी गोंदिया शहरात एक काळविट आले होते. त्यातच जंगल परिसरातील गावांमध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा शोधात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असल्याचे चित्र आहे. सालेकसा तालुका हा जंगलव्याप्त असल्याने या भागात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. सोमवारी पहाटेच्या सुमारास जंगलातून पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असलेल्या दोन अस्वल विहिरीत पडल्याची घटना घडली. दरम्यान याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी व वनकर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले. त्या अस्वलांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी एक रेस्क्यू टीम तयार करण्यात आली होती. दोन्ही अस्वलांना चार तासांच्या मोहीमेनंतर बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही अस्वले वयस्क आहेत. नर-मादा असल्याचे सांगितले जाते. यानंतर त्यांना घनदाट जंगलात सोडण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पशूविकास अधिकारी डॉ.खोडसकर व डॉ. वऱ्हाडपांडे यांचा समावेश आहे. रेस्क्यूची कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी ए.बी.इलमकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव