शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
5
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
6
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
7
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
8
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
9
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
10
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
11
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
12
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
13
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
14
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
15
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
16
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
17
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
18
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
19
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
20
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 

बावीस नव्हे,वीस-दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 21:44 IST

मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्या वाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश लोकांना ही पध्दती चुकीची वाटत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

ठळक मुद्देसंख्या वाचनाची नवी पद्धत : समजलेले अंक अक्षरात लिहिताना गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्या वाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश लोकांना ही पध्दती चुकीची वाटत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. भाषा सौंदर्यावर जसा हा परिणाम करणारा बदल आहे, तसा व्यावहारिकदृष्ट्याही प्रतिकुल ठरेल अशी खंतही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा नवा बदल घोकमपट्टीऐवजी समज वाढविणारा असल्याने स्वागतही झाले आहे.पारंपरिक संख्या वाचनाच्या पद्धतीतून अनेक पिढ्या शिकल्या आहेत. मग त्यांना जोडाक्षरे अन् गणिताची भीती नव्हती का? असा सवाल शिक्षकांचा आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे या पद्धतीमुळे नामशेष होतील. परिणामी, ही पद्धत भाषा सौंदर्यात कशी बसणार, अशी खंत व्यक्त केली जात आहे. नवी पद्धत दाक्षिणात्य असून इंग्रजीच्या धर्तीवर आहे. सुरुवातीला ही पद्धत गोंधळाची वाटत असली तरी गणिती कल्पकतेला वाव देणारी आणि भाषा सौंदर्यावर शून्य परिणाम करणारी ठरेल,असा विश्वासही गणित तज्ज्ञांचा आहे. यावर तिव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.अंक वाचणाच्या नवीन पध्दतीची गरज का?पारंपारीक पध्दतीनुसार अनेक पिढ्यांनी अंकवाचन शिकले. मग नवी पध्दती आणण्याची गरज का आहे. ही पध्दती आधीपासूनच अमंलात का आणली गेली नाही. ही पध्दती लागू करण्याच्या पूर्वी शिक्षकांचे प्रशिक्षण नाही. थेट अभ्यासक्रमात करण्यात आलेला बदल गोंधळ निर्माण करणारा आहे.-प्रकाश ब्राम्हणकर, विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती.मूळ संख्येत कायमस्वरूपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या समजण्यासाठी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ही पध्दत योग्य आहे. त्यामुळे या पध्दतीचा इतका संभ्रम करण्याची गरज नाही. इंग्रजीच्या तालवार चालण्यासाठी ही पध्दत आहे. त्यामुळे क्रमाने वाचन होण्यास मदत होईल. फक्त समजाण्यासाठी याचा वापर व्हावा.-एल.यू. खोब्रागडे, मुख्याध्यापक, कारंजा.काळानुसार अभ्यासक्रम बदल होणे गरजेचे आहे. वीस-दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना शिकविणे आणि त्यांना कळणे सोपे जाणार आहे. मूळ संख्यानामात कायमस्वरुपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या कळण्यासाठी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ही पद्धत योग्य आहे. या बदलात गणिती कल्पकतेला खूप चालना मिळेल.-अनिरूध्द मेश्राम, जिल्हा सरचीटणीस शिक्षक संघ.काळानुरूप गणित विषयात बदल होत असला तरी पारंपारीक असलेल्या संकल्पना आपण दूर सारू शकत नाही. अशा बदलामुळे विद्यार्थ्यांना समजायला संकल्पना सोप्या असल्या तरी अंकाचा जो पारंपारीक ढाचा आहे तो ढासळल्याशिवाय राहणार नाही. अशा बदलांचे वाईट असे दूरगामी परिणाम सर्वांना भोगावे लागतील.- किशोर डोंगरवार, सहसचिव, शिक्षक समिती.शिकविणाऱ्यांना वळण जुने असते. त्यामुळे नवीन संकल्पना स्वीकारताना चुकल्यासारखे वाटते. परंतु, सवय झाल्यानंतर अंगवळणी पडते. संख्यावाचनाची नवी पद्धत अंगवळणी पडेल. त्यामुळे या पद्धतीचा इतका संभ्रम करण्याची गरज नाही. नवे धोरण-नव्या संकल्पना विचारपूर्वकच अंमलात आणल्या जातात. ते स्वीकारणे अपरिहार्य असते. भाषा सौंदर्य मात्र या नव्या पद्धतीतून लोप पावणार आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे कालबाह्य होतील, अशी भीती आहे.-प्रभा गायधने, शिक्षीका, जि.प. बोरकन्हारनव्या पद्धतीमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. पारंपरिक संख्या वाचनाची पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे. यातून भाषा सौंदर्य जोडाक्षरांचेही ज्ञान विद्यार्थ्यांना होते. ७६ रुपये किलोने एखादी वस्तू घ्यायची असेल तर ७०-६ म्हणायचे का? व्यावहारिकदृष्ट्या नवी पद्धत योग्य वाटत नाही. १ ते १०० पर्यंत आकडे लिहिण्याची व वाचण्याची जी पद्धत गॅझेटमध्ये आहे, तीच पद्धत अभ्यासक्रमात हवी. - विरेंद्रकुमार कटरे, सहशिक्षक बलमाटोला.विद्यार्थ्यांना काही अंक लिहिता येत नाहीत म्हणून बालभारतीने संख्यावाचनात बदल करून संख्येच्या नावाची ओळख नाहिशी करण्याचा हा प्रकार आहे. दुसरीच्या संख्यावाचनातील बदल चुकीचा आहे. त्यामुळे शिकविण्यासाठी अडचणीचे ठरेल. बावन ऐवजी पन्नास-दोन, त्रेचाळीसऐवजी चाळीस-तीन असे वाचने म्हणजे बावन, त्रेचाळी ही संख्येच्या नावाची मुळ ओळख नाहिशी करणे होईल. - शरद उपलपवार, मुख्याध्यापक जि.प. शाळा पदमपूर.

जुनीच पद्धती अत्यंत चांगली आहे. ही पद्धती मुलांना गोंधळात टाकणारी आहे. बोलायला सोपे म्हणून वेगळे सांगाल पण व्यवहारात ते येणार नाही तर त्यात पुन्हा संभ्रम निर्माण होईल. त्या संख्येला अक्षरात कसे लिहावे हा प्रश्न विद्यार्थ्यांना होईल. -सुनील श्रीवास्तव,राज्याध्यक्ष महाराष्ट्र गणीत अध्यापक मंडळ.

टॅग्स :Educationशिक्षण