प्रकृती धोक्याबाहेर : गोंदियात उपचार सुरूगोंदिया : श्रीगणेशाच्या आरतीनंतर प्रसाद खाल्ल्याने २० जणांना विषबाधा झाली. त्यांना उपचारसाठी गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तसेच खासगी रूग्णालयात शुक्रवारच्या पहाटे दाखल करण्यात आले. सदर घटना गोरेगाव तालुक्याच्या गोवारीटोला येथील आहे. गुरूवारी श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. गोवारीटोला येथील तोषराम अवरासे यांच्या घर ही गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली. रात्री ९.३० वाजतादरम्यान आरती करण्यात आली. त्यानंतर मोदक प्रसाद म्हणून देण्यात आले. ज्यांनी प्रसाद खाल्ला त्यांना काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. काही लोकांना जिभ जड वाटू लागली. मळमळ वाटू लागल्यावर प्रसादात काही असावे अशी शंका आली. त्यांना वेळीच गोंदियाच्या केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल करण्यात आले.केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात विजय गुणाजी चौधरी (२५), योगीता तेजराम चौधरी (२०), भोजराज इसराम अवरासे (५०), अनंतराम यादोराव अवरासे (४०), ओमकार ओझीराम अवरासे (५७), रवींद्र देवराम रहांगडाले (१६), योगेश पुरनलाल अवरासे (१५), किसन मेश्राम (६०), बिरनबाई अवरासे (५०), अश्विन अवरासे (१७), विक्रम अवरासे (६०) यांना भरती केले. पाच ते सात बालकांना बाई गंगाबाई महिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना सुटी देण्यात आली. खासगी रूग्णालयात आनंदराव डोमाजी अवरासे (४०) यांना दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्याला केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्याअतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. मोदकामध्ये उंदीरमार पावडर असल्याची शंका निर्माण झाली होती.
्नेगोवारीटोल्यात २० गणेशभक्तांना प्रसादातून विषबाधा
By admin | Updated: September 19, 2015 02:48 IST