शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

लाखो रुपयांची उलाढाल केवळ चिटोऱ्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:04 IST

शहर व जिल्ह्यातील नामांकित खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतूृनच पाठ्यपुस्तके आणि गणवेश घेण्याची सक्ती केली आहे. यासाठी या शाळांनी काही पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांशी टक्केवारीवर छुपा करार केला आहे.

ठळक मुद्देखासगी शाळा आणि विक्रेते यांच्यात छुपा करार : न.प.कडे नोंदणीच नाही, शिक्षण विभाग झोपेत

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहर व जिल्ह्यातील नामांकित खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतूृनच पाठ्यपुस्तके आणि गणवेश घेण्याची सक्ती केली आहे. यासाठी या शाळांनी काही पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांशी टक्केवारीवर छुपा करार केला आहे. या संपूर्ण व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होते मात्र ही सर्व उलाढाल कोणत्याही अधिकृत बिल बुकावर नव्हे तर कागदाच्या एका चिटोºयावर होत आहे. यामुळे शासनाचा सुध्दा कर देखील बुडत आहे.सध्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य मागे राहू नये यासाठी पालकांचा कल खासगी नामाकिंत इंग्रजी शाळांकडे अधिक आहे.५० हजार रुपयांपर्यत शैक्षणिक शुल्क असले तरी पालक इतर खर्चात काटकसर करुन आपल्या पाल्यांना या नामाकिंत खासगी शाळात शिकवित आहे. मात्र पालकांच्या नेमक्या याच अडचणीचा काही नामाकिंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांना फायदा घेवून पालकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करीत आहे.या शाळांमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करावी लागतील अशी सक्ती केली जात आहे. यासाठी काही शाळांना ग्राहक भंडाराची स्थापना करुन तर काहींनी काही विक्रेत्यांना टक्केवारीवर शाळेतच दुकान लावण्याची परवानगी दिली आहे.या शाळांच्या दृष्टीने यात काही गैर नसले तरी मात्र बाजारपेठेपेक्षा शाळांमधून विक्री केल्या जाणाºया शैक्षणिक साहित्याचे दर अधिक असल्याने प्रती पालकांना हजार रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागत आहे.मात्र आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालक देखील मागील तीन चार वर्षांपासून खासगी शाळांकडून केली जाणारी सक्ती मुकाट्याने सहन करीत आहे. तर जे पालक याला विरोध करतात त्यांना त्यांच्या पाल्याला दुसºया शाळेत शिकविण्याशिवाय पर्याय नसतो.त्यामुळे पालक सुध्दा याचा पुढे येऊन विरोध करीत नसल्याची वास्तविकता आहे. मात्र लोकमत आणि शिक्षा संघर्ष समितीने या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर पालक देखील आता पुढे येऊन बोलू लागल्याचे दिलादायक चित्र आहे.पाठ्यपुस्तकाच्या पक्क्या बिलाचा अभावनामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली आहे. यासाठीे शाळांनी काही पाठ्यपुस्तक विक्रेत्यांशी करार केला आहे. विद्यार्थ्यांना पाठपुस्तके घेतल्यानंतर पक्के बिल दिले जात नसून केवळ कागदाच्या एका चिटोºयावर लाखो रुपयांचा व्यवहार सुरू आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.टक्केवारीवर लाखो रुपयांची उलाढालखासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेतूनच पाठपुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. इयत्ता पाचवीच्या एका विद्यार्थ्याला किमान चार हजार रुपयांचे पाठ्यपुस्तके घ्यावे लागतात. या शाळांमध्ये तब्बल २० ते २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून यातून लाखो रूपयांची उलाढाल होते. या उलाढालीमध्ये शाळांची टक्केवारी ठरली असते. त्यामुळे शाळांमध्ये विक्रेत्यांना पाठ्यपुस्तके विक्री करण्यासाठी दुकान लावण्याची परवानगी दिली जात असल्याची माहिती आहे.न.प.परवाना विभागाकडे नोंदणीच नाहीखासगी शाळांमध्ये ग्राहक भंडार उघडण्यासाठी नगर परिषद परवाना विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. तसेच त्याची नोंदणी करावी लागते. मात्र बºयाच नामाकिंत खासगी शाळा नगर परिषद परवाना विभागाकडे नोंदणी अथवा परवाना न घेताच पाठ्यपुस्तकांची विक्री करीत आहे.विशेष म्हणजे नगर परिषदेकडे सुध्दा याची कुठलीच नोंद नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.पालकांचा रोष टाळण्यासाठी वेळापत्रकखासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पाठ्यपुस्तकांची शाळेतून विक्री करताना सर्व पालक एकाच वेळीच आल्यास रोषाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी खासगी शाळांनी प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे दिवस निश्चित करुन दिले आहे. याचे वेळापत्रक शाळेच्या प्रवेश पुस्तकासोबतच दिले जात आहे. दरम्यान दरवर्षी पाठ्यपुस्तकांच्या किमतीमध्ये सुद्धा भरमसाठ वाढ केली जात आहे.शिक्षण विभाग म्हणतो आमच्याकडे तक्रार नंतर बघूशहरातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून सक्तीच्या नावावर पालकांची लूट केली जात आहे. याबाबत पालकांमध्ये रोष आहे. मात्र यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी आधी आमच्याकडे लिखीत तक्रार करा नंतर कारवाही करायचे बघू असे उत्तर देत आहे. त्यामुळे पालकांमध्ये शिक्षण विभागाप्रती रोष व्याप्त आहे.दरवर्षी नवीन बुटांची सक्ती काखासगी शाळा आणि पाठ्यपुस्तक विक्रेते यांच्याशी टक्केवारीचा छुपा करार असल्याची बाब आता लपून राहिली नाही. त्यामुळे अधिकाधिक बिल झाल्यास मिळणाºया टक्केवारीत सुध्दा वाढ होते. त्यामुळेच या खासगी शाळांकडून दरवर्षी नवीन जोडे घेण्याची सक्ती केली जाते.दोन दिवसात जुळले ७५० पालकशहर आणि जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या काही खासगी शाळांकडून पाठ्यपुस्तकांच्या सक्तीच्या नावावर लूट केली जात आहे. याचा विरोध करण्यासाठी शिक्षा संघर्ष समिती नावाने एक व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून दोनच दिवसात या ग्रुपशी ७५० पालक जुळले असून त्यावर आपले मत व समस्या मांडत आहे. यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त असल्याचे दिसून येते.लोकमतचे मानले आभारखासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून सक्तीच्या नावावर पालकांची लूट केली जात आहे. लोकमतने हा मुद्दा लावून धरुन पालकांच्या समस्यांना वाचा फोडल्याने अनेक पालकांनी लोकमतचे आभार मानले. तसेच आम्ही अजून पुरावे देऊ हा प्रश्न लावून धरा, अशी मागणी केली . 

टॅग्स :Schoolशाळा