शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

रेल्वे स्थानकावरील मेटल डिटेक्टर यंत्रणा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:54 IST

मुंबई-हावडा मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावतात. तर हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. विविध सुविधांमुळे या रेल्वे स्थानकाला चांगल्या रेल्वेस्थानकाचा दर्जा मिळाला असला तरी सुरक्षाविषयक उपाय योजनेत हे पूर्णपणे फेल ठरले.

ठळक मुद्देसुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर : पार्सल कार्यालयातून ये-जा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंबई-हावडा मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावतात. तर हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. विविध सुविधांमुळे या रेल्वे स्थानकाला चांगल्या रेल्वेस्थानकाचा दर्जा मिळाला असला तरी सुरक्षाविषयक उपाय योजनेत हे पूर्णपणे फेल ठरले. रेल्वे स्थानकावरील मेटल डिटेक्टर यंत्रणा मागील सहा महिन्यापासून बंद पडली असून अद्यापही ती पूर्ववत न केल्याने रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाºयावर आहे.दिवसेंदिवस गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विकासात भर पडत आहे. मागील वर्षी येथे मेटल डिटेक्टर मशीन लावण्यात आली. मात्र सद्यस्थितीत ही मेटल डिटेक्टर मशीन बंद असल्याने रेल्वे स्थानकात ये-जा करणारे सर्रासपणे आपल्या सामानांसह रेल्वे स्थानकाच्या आत व बाहेर प्रवेश करतात. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसर किंवा रेल्वेगाड्यांमध्ये कधीही घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्टÑाच्या टोकावर गोंदिया जिल्हा असून येथे जंक्शन रेल्वे स्थानक आहे. नागपूर, रायपूर, जबलपूर व चंद्रपूर अशा चारही दिशांनी येथून दररोज दीडशेच्यावर रेल्वेगाड्या धावतात. हजारो-लाखो टन माल वाहतूक (वस्तू) रेल्वेद्वारे केली जाते. विशेष म्हणजे सर्वाधिक मालवाहतुकीतून उत्पन मिळवून देणारे रेल्वे स्थानक म्हणून या स्थानकाची ओळख आहे. मात्र रेल्वेतून जो माल पार्सल केला जातो. त्या पार्सलला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन किंवा तपासण्याची कोणतीही व्यवस्था सध्यास्थितीत गोंदिया रेल्वे स्थानकावर उपलब्ध नाही. कधी कधी तर पार्सल कार्यालयातूनच प्रवाशांची ये-जा सुरू असते. पार्सल केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅनर लावण्याची जबाबदारी वाणिज्य विभागाची आहे. पार्सलला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासणीसाठी नियम व कायदा प्रस्तावित आहे. पार्सलसाठी काही गाड्यांना कंत्राटीतत्वावर दिल्या जातात. लाखो टन माल कोणतीही तपासणी व स्कॅन न करता अनेक रेल्वेगाड्यांतून ने-आण करतात.दुसरीकडे गोंदिया रेल्वे स्थानकाचे बाजार परिसराकडील प्रवेशद्वार व होमप्लॅटफार्म यांच्या मधात मेटल डिटेक्टर मशीन मागील वर्षी लावण्यात आली होती. काही दिवसांपर्यंत ही सेवा सुरळीत सुरू होती. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी या मेटल डिटेक्टर मशीनमधून जावे लागत होते. प्रवाशांना त्यांच्या वस्तू स्कॅनर मशीनमध्ये टाकाव्या लागत होत्या. मात्र अल्पावधीतच मेटल डिटेक्टर मशीन बंद पडली. त्यामुळे कोणताही व्यक्ती सामान घेवून थेट रेल्वे स्थानकात प्रवेश करतो. रेल्वे सुरक्षिततेच्या त्रुटीचा फायदा घेवून कोणताही स्फोटक पदार्थ पार्सल करून असामाजिक तत्वांनी हल्ला चढविला तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.