परसवाडा : तिरोडा नगर परिषदेची स्थापना सन १९५२ मध्ये झाली. येथील मोठी जागा शेती व झुडपी जंगलात मोडते. हळूहळू तिरोडा शहर व तालुका विकसित होत गेले. घरे व लोकसंख्याही वाढत गेली. रस्ते बांधकामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले. मात्र त्यात एक प्रकार असाही आहे की भूसंपादन होऊन अनेक वर्षे लोटली पण त्याचा शेतमालकाला शासनाकडून मोबदलासुद्धा मिळाला नाही..................... तरी अद्याप वाहन वळण महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही.
तिरोडा शहरातून दोन महामार्ग जातात. तुमसर-तिरोडा-गोंदिया हा एक महामार्ग तर दुसरा तिरोडा ते खैरलांजी बालाघाट हा आंतरराज्यीय महामार्ग असून महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा आहे. परंतु या दोन्ही महामार्गांना जोडणारा प्रशस्त असा वाहन वळण मार्ग तिरोडा शहरात नाही. त्यामुळे हलके वाहन असो किंवा अजवड वाहने असो, सर्व प्रकारच्या वाहनांना तिरोडा बाजार परिसरातूनच जावे लागते. यासाठी बसस्थानक, युनियन बँक वळण, कन्या शाळा, हुतात्मा स्मारक पोलीस ठाणे, अवंतीबाई चौक ते सरळ रेल्वे चौकी होत खैरलांजी, मध्यप्रदेश असा प्रवास होतो. युनियन बँक ते अवंतीबाई चौकापर्यंत चार ठिकाणी वाहनाला वळण घ्यावे लागते. शिवाय या परिसरात सर्व व्यापारी लाईन दुकान असल्यामुळे नागरिकांची नेहमी मोठी वर्दळ असते. त्यामुळे दोन महामार्गांना जोडण्यासाठी शहरातून मधातून वळणे होत जाणारा हा मार्ग अयोग्य आहे. तसेच दुसरा मार्ग म्हणजे तिरोडा-गोदिया मार्गावरील न्यायालयाच्या समोरून प्रेमबंधन लॉन पण हाही रस्ता शहराच्या आतून जात असल्यामुळे अवजड वाहतुकीकरिता दोन्ही महामार्गांना जोडण्यासाठी उपयुक्त नाही.
..........
खैरलांजी रोड, महाप्रज्ञा बुद्धविहार ते गोंदिया रोड बायपास रस्ता
यावर उपाययोजना करण्यासाठी तत्कालीन आमदार दिलीप बन्सोड यांच्या कार्यकाळात कार्यवाही करण्यात आली होती. तिरोडा-गोंदिया मार्गावरील चंद्रभागा स्मशान घाटाजवळील रूपाली बार ते तिरोडा-खैरलांजी मार्गावरील महाप्रज्ञा बुद्धविहार या दरम्यान भूमाक्र. १०/अ-२००७-२००८ मौजा खैरबोडी येथील ३०४.९५ हे.आर. मी.जमीन वळण मार्ग बांधकामासाठी संपादित करण्यात आली. कालांतराने सर्व शेतजमीनधारकांना त्यांचा मोबदलासुद्धा मिळाला आहे..................................
......
कुणाच्या परवानगीने शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीने मार्किंग केली
अवंतीबाई चौक ते जावेद ट्रेडर्स या दरम्यानच्या रस्त्याचा भाग नगर परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत नाही, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बारापात्रे यांचे म्हणणे असून यासंदर्भात पुरावेसुद्धा त्यांनी गोळा केले आहेत. शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीने आता जानेवारी २०२१ मध्ये दोन्ही बाजूंनी सहा-सहा मीटरची मार्किंग केली. त्यानुसार अतिक्रमण तोडून रस्ता बांधकाम करण्यात येणार होता. या मार्किंगला व्यापारी संघटनेचे सध्याच्या मुख्याधिकारी यांना विचारणा केली. भूसंपादित जागेतून वळण महामार्ग व्यापारी संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा सुनील बारापात्रे व इतर व्यापाऱ्यांनी दिला आहे.