शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याने केला तुडतुडा सर्वेक्षणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:08 IST

सन २०१७-१८ या वर्षात तुडतुडा रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना तलाठी, कृषी सहायक व कोतवालांनी सर्वेक्षणात घोळ केला. पैसे घेऊन मर्जीतील शेतकऱ्यांचे नावे लाभार्थी यादीत टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

ठळक मुद्देएलोडी परिसरातील शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : सन २०१७-१८ या वर्षात तुडतुडा रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना तलाठी, कृषी सहायक व कोतवालांनी सर्वेक्षणात घोळ केला. पैसे घेऊन मर्जीतील शेतकऱ्यांचे नावे लाभार्थी यादीत टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे धाबेपवनी तलाठी साजा क्रमांक २७ मधील शेकडो शेतकरी शासकीय मदतीपासून वंचीत राहीले.सदर प्रकरण बँकेकडे आलेल्या लाभार्थी यादीवरुन वंचित शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. सर्वेक्षण करणाऱ्या तलाठी, कोतवाल, कृषी सहाय्यक यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाही करण्याची मागणी येलोडी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी केलेल्या तक्रारीतून केला.सन २०१७-१८ मध्ये तुडतुडा या रोगाने धाबेपवनी तलाठी साझा क्रमांक २७ अंतर्गत येणाऱ्या रामपुरी, एलोडी, जांभळी, धाबेपवनी, तिडगा या गावातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल.या गावातील शेतकऱ्यांनी तुडतुड्याने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल यांनी केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली. बँकेकडे लाभार्थी शेतकºयांची यादीही आली.परंतु सदर यादीत तुडतुड्याने नुकसान झालेल्या श्ोतकऱ्यांची नावे नव्हती. त्यामुळे येलोडी परिसरातील शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित राहीले.सर्वेक्षण करताना तलाठी, कृषी सहाय्यक व कोतवाल यांनी पैशाची देवाण-घेवाण करुन मर्जीतील शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत टाकल्याने योग्य लाभार्थी मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत केला आहे.ज्या शेतकºयांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून सर्वेक्षण करण्यात आले. यात कुठलाही घोळ झालेला नाही. तुडतुडा या रोगाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत मिळावी कुणीही मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घेतली.-मिलिंदकुमार जांभूळकर, तलाठी, धाबेपवनी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी