शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतोय कस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला घेऊन सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका लांबल्याने अनेक उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. बुधवारी (दि.१५) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी गुरुवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू केली. प्रचारासाठी आता केवळ तीनच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचताना नेत्यांसह उमेदवारांचासुद्धा कस लागत आहे. ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती; मात्र याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाने या निवडणुका ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर बुधवारी (दि.१५) सर्वोच्य न्यायालयाने सुनावणी करीत ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ओबीसी जागा वगळूनच आता निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे; पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे क्षेत्र मोठे असल्याने केवळ तीन दिवसांच्या कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांसह नेत्यांचासुद्धा कस लागत आहे. 

दोन दिवस दिग्गजांच्या सभा जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी यावेळी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. खा. प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे शुक्रवारी उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा प्रचारासाठी जिल्ह्यात येणार आहेत.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद