शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

शेतकरी व बेरोजगारांच्या फसवणुकीचा प्रयत्न

By admin | Updated: February 8, 2017 01:12 IST

पतंजलीने कोणाशीही कोणताच करार केला नाही; मात्र काही भामटे आमचा पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाल्याचे सांगून

तिरोडा : पतंजलीने कोणाशीही कोणताच करार केला नाही; मात्र काही भामटे आमचा पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाल्याचे सांगून शेतकरी व बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा फसव्या लोकांपासून व प्रचारापासून सावध राहा, असे आवाहन पतंजली किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी दादासाहेब फुंडे यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पतंजली किसान सेवा समितीची बैठक पार पडली. त्यात जवळपास ४० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.फुंडे पुढे म्हणाले, पतंजली योगपीठ हरिद्वारद्वारे नागपूर जिल्ह्यातील मिहान येथे पतंजली मेगा फूड पार्क प्रकल्प उभारला जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त व जैविक उत्पादनांची मागणी वाढणार आहे. सुशिक्षित, अशिक्षित, बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच संधीचा लाभ काही संधीसाधूंनी उचलण्याचा सपाटा ग्रामीण भागात सुरू केला आहे. स्वदेशीच्या नावावर स्थापित अनेक संस्थांच्या नावांचा उपयोग करीत पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाला, आमच्याद्वारेच ते शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार व बेरोजगारांना रोजगार देणार अशी बतावणी करून शेतकरी व बेरोजगार यांची दिशाभूल केली जात आहे. हे भामटे शेतकऱ्यांची शेतजमीन एकरी ५० हजार रूपयेप्रमाणे वर्षाच्या करारपट्टीवर घेण्याचे आमिष दाखवितात. त्यासाठी नोंदणी शुल्क सहा हजार रूपये तर बेरोजगारांना या प्रकल्पात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार रूपये प्रक्रिया शुल्क वसूल करून बायोडाटा स्वीकारत असल्याचे उघडकीस येत आहे. अशा फसव्या लोकांपासून सावध रहा, असे आवाहन करीत ते म्हणाले, पतंजलीच्या कार्यपद्धतीनुसार मिहान येथील फूडपार्कला लागणारा शेतमाल पतंजली थेट शेतकऱ्यांजवळून विकत घेणार आहे. त्यात कोणताही दलाल मध्ये राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी नागेश गौतम, लक्ष्मी आंबेडारे, पंकज रहांगडाले आदी उपस्थित होते.