शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

३३ वर्षांपासूनची शांतता भंग करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:05 IST

ब्रिटीशांच्या काळात झालेला हिंदू-मुस्लीम वाद गोंदिया जिल्हा पोलिस आता ग्राह्य धरीत आहे. मागील ३३ वर्षापासून सडक-अर्जुनीत हिंदू-मुस्लीम यांच्यात जातीय सलोखा नांदत असताना पोलिसांनी गणेश भक्ताला मिरवणुकीत भाग घेण्यास मनाई केली आहे.

ठळक मुद्देगिऱ्हेपुंजे यांचा आरोप : विशेष शांतता पुरस्काराच्या मानकऱ्यास बदनाम करण्याचा खटाटोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: ब्रिटीशांच्या काळात झालेला हिंदू-मुस्लीम वाद गोंदिया जिल्हा पोलिस आता ग्राह्य धरीत आहे. मागील ३३ वर्षापासून सडक-अर्जुनीत हिंदू-मुस्लीम यांच्यात जातीय सलोखा नांदत असताना पोलिसांनी गणेश भक्ताला मिरवणुकीत भाग घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पोलीसच गावातील शांतता भंग करण्याच्या प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी केला आहे.ब्रिटीशांच्या काळात सडक-अर्जुनी येथे जातीय दंगल घडली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर सडक-अर्जुनी येथे मागील ३३ वर्षापासून शिव गणेश मंडळ गणेश स्थापना करीत आहे. या गावात दिवाळी व ईद हे दोन्ही सण हिंदू-मुस्लीम समाजबांधव एकोप्याने साजरा करतात. परंतु या परंपरेला छेद लावण्याचे काम पोलीस करीत असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेत सडक-अर्जुनी या गावाने विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. त्यांचा गौरव मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला होता. दरवर्षी गणेशोत्सवात शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू-मुस्लीम यांच्या बैठका घेतल्या जातात.यंदाही आतापर्यंत सहा बैठका घेण्यात आल्या. या सहा बैठकांमध्येही सर्व धर्माच्या लोकांनी सण शांततेत साजरा होईल असे सांगितले. परंतु डुग्गीपारचे ठाणेदार यांनी ९ सप्टेंबर २०१८ रोजी जा.क्र.२२८६/२०१८ च्या पत्रान्वये अचानक १४ सप्टेंबर २०१८ ला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मला गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेऊ नका असे पत्र काढले. मिरवणुकीत भाग घेतल्यास कलम १४४ अन्वये कारवाईचे पत्र दिल्याचे गिऱ्हेपुंजे यांनी सांगितले. सडक-अर्जुनी येथे २५ टक्के मुस्लीम बांधव आहेत. माझ्या संदर्भात ना हिंदूची, ना मुस्लीम बांधवांची तक्रार आहे. परंतु पोलीस विभागाच मला संशयाच्या भोवºयात घेत मिरवणुकीत भाग न घेण्याचे नोटीस बजावले आहे.ते गुन्हे राजकारणामुळेमी राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहे. राजकारण किंवा समाजकारण करताना आलेल्या अडचणींमुळे विरोधातला व्यक्ती तक्रार करतो व पोलीस गुन्हे दाखल करतात. असे १९८९ पासून २००४ या काळात ९ गुन्हे दाखल केलेत. परंतु या गुन्ह्यांमध्ये मला अडकविण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने यापैकी निकाली काढलेल्या कोणत्याही गुन्ह्यात मी दोषी आढळलो नाही. गणेशोत्सवात माझ्यावर कसलेही गुन्हे दाखल नसताना पोलीस विभाग मला शांतता भंग करणारा व्यक्ती ठरवून मला समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गिऱ्हेपुंजे यांनी केला आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोण व्यक्ती कसा याची माहिती पोलीस ठाण्याला असते. डुग्गीपार पोलीस ठाण्यामार्फत आलेल्या अहवालानुसार आम्ही कार्यवाही केलेली आहे.- प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी.

टॅग्स :PoliceपोलिसGanesh Visarjanगणेश विसर्जन