शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

अपंग महिलेला गावकऱ्यांचा व ग्रामपंचायतचा त्रास

By admin | Updated: June 23, 2014 00:11 IST

तालुक्यातील नवागड (पिपरिया) येथील सुरेखा मोहनलाल दमाहे यांचा रोजगारासाठी चालवित असलेला पानठेला ग्रामपंचायतने अतिक्रमणाच्या नावाखाली जप्त केला. सदर महिलेचे ४० हजार रुपयाचे

सालेकसा : तालुक्यातील नवागड (पिपरिया) येथील सुरेखा मोहनलाल दमाहे यांचा रोजगारासाठी चालवित असलेला पानठेला ग्रामपंचायतने अतिक्रमणाच्या नावाखाली जप्त केला. सदर महिलेचे ४० हजार रुपयाचे नुकसान करुन त्या अपंग महिलेला त्रास देण्यात येत असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, खंडविकास अधिकारी व सालेकसाचे तहसीलदार यांना देण्यात आली आहे.नवागड येथे मंदिराजवळच्या मोकळ्या जागेच्या एका बाजूला २०१० पासून दमाहे यांचा पानठेला व किराणा दुकान आहे. दुकान चालविण्यासाठी भारतीय स्टेट बँक शाखा आमगाव येथून त्यांनी ४० हजार रुपयांचे कर्जही घेतलेले होते. दमाहे यांचा मुलगासुद्धा अपंग आहे. याच पानठेल्यावर त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह चालतो. गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे तीन वेळा पानठेल्याची जागा बदलण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना कोणताही त्रास नाही.२०१३ मध्ये गावातील काही लोकांनी राजकीय वैर काढण्यासाठी पानठेला हटविण्यासाठी ग्रामपंचायतीला तक्रार करणे सुरु केले. त्यानुसार ग्रामपंचायतीने ७ व १६ व २३ जानेवारी २०१४ ते २८ एप्रिल २०१४ ला दुकानाचे कुलूप तोडून नियमबाह्य पद्धतीने पानठेला ग्रामपंचायतीत नेण्यात आला. दुकान व सामान असे एकूण ५० हजाराचे नुकसान करण्यात आले.नवागड गावात अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. परंतु त्या कोणाचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. फक्त अपंग महिलेचेच अतिक्रमण हटविण्यात आले. काही गावकरी दमाहे यांच्या घरीही गेले हाते. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी लोकांना अटक करताना सत्तारूढ पक्षाच्या आमदाराने त्यांना वाचविण्याचे काम केले. काँग्रेस सरकार महिलांच्या सबलीकरणाचे काम करताना काही लोक महिलेच्या दुकानाला अतिक्रमणाच्या नावाखाली बेरोजगार करतात. हा महिलेवर ग्रामपंचायतीने व गावकऱ्यांनी केलेला अन्याय आहे. तेव्हा हा झालेला अन्याय दूर करण्यात यावा म्हणून सुरेखा दमाहे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, ठाणेदार, खंडविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दिलेला आहे. अतिक्रमणाची कार्यवाही नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेली असून दमाहे यांना बेरोजगार करण्याचे काम ग्रामपंचायतीने केलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)