शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:36 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन पंचायत समिती सभापती अर्चना राऊत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक समितीची मागणी : सभापतींसोबत शिष्टमंडळाची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन पंचायत समिती सभापती अर्चना राऊत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.शिक्षक समितीचे मार्गदर्शक एस.जे.जोगी यांच्या नेतृत्वात प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती अर्चना राऊत होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम.एल.मेश्राम, शिक्षण विभागाचे अधीक्षक एस.आर.वंजारी व सर्व लिपीक उपस्थित होते.बैठकीत, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करुन पगार काढण्यात यावे याविषयावर चर्चा करण्यात आली. यावर सध्या जिल्हास्तरावरुन कोणतेही आदेश नसल्यामुळे लांबणीवर असल्याचे गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांनी सांगीतले. मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे जीपीएफ व डीसीपीएफचे चालान व शेड्युल जिल्हा परिषदेला पाठविणे, चटोपाध्याय व एकस्तरचे प्रकरण जि.प.पाठविणे, एसजीएसपीचे लाभ घेण्यासाठी माहे मार्च २०१९ पासून शिक्षणाचे पगार एसबीआय शाखा आमगावातून करणे, २ व १४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव जि.प.लापाठविणे, प्रत्येक महिन्याच्या पगाराचे वाऊचर क्रमांक प्रत्येक शाळेला पुरविणे, नक्षल भत्तामध्ये पाचवा वेतन आयोगानुसार निश्चिती करुन माहे एप्रिलच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी, चुकीची वेतन निश्चिती करुन सेवा पुस्तिकेची पाने खराब करणाऱ्या लिपीकांना ताकीद देण्यात यावी, पानगाव शाळेचे प्रकरण निकाली काढण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात यावा, भारतीय जीवन बिमाचे २००९ ते २०१४ पर्यंत शिक्षकांच्या वेतनातून कपात व पाठविलेल्या शेड्युल यामध्ये असलेली तफावत दूर करण्यासाठी विशेष कॅम्प मार्चमध्ये लावण्यात यावे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.सर्व प्रलंबीत समस्या निकाली काढण्याचे आश्वासन सभापती राऊत व गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांनी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. संचालन डी.एस.कुराहे यांनी केले. आभार जयेश लिल्हारे यांनी मानले. बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सतीश दमाहे, सरचिटचणीस जी.सी.बघेले, कार्याध्यक्ष टी.आर.लिल्हारे, प्रसिध्दीप्रमुख आर.एस.बसोने, ए.बी.बोरकर, पी.एम.फरकुंडे, जयेश लिल्हारे, आर.के.बोरकर, कोसरकर, एस.बी.खोब्रागडे, पी.एम.ढेकवार उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक