शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : गोंदिया जिल्ह्यातील चुरडीत ट्रान्सपोर्ट व्यावसायीक कुटुंबांतील चौघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 14:33 IST

चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. २१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबियांच्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या लोकांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून ठार केले. 

ठळक मुद्देआरोपींना दाखवायचा होता गृहकलह: तिघांना स्पेंडलने मारले तर एकाला लावला गळफास

गोंदिया : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी १० वाजता ड्रायव्हर वाहन घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला घरात ४ मृतदेह दिसून आले. एकाच कुटुंबातील चौघांचा खून हा व्यवसायातून झाला की संपत्तीतून झाला हे सांगता येत नाही. आतापर्यंत या खुनाचा उलगडा झाला नाही. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये अनेक आरोपींचा समावेश असावा असा कयास लावला जात आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रेवचंद डोंगरु बिसेन (५१), मालता रेवचंद्र बिसेन (४५), पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०), तेजस रेवचंद बिसेन (१७) अशी एकाच कुटुंबातील मृत चौघांची नावे आहेत. रेवचंद डोंगरु बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. ते ट्रान्सपोर्टचे काम करतात. रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचे काम ते करीत होते. २१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबियांच्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या लोकांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून ठार केले. 

मालता रेवचंद बिसेन ह्या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या हाेत्या. बहिण पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व भाऊ तेजस रेवचंद बिसेन (१७) हे दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला. गळफास लावलेला दोर दारातून खिडकीला बांधून ठेवला होता. आरोपींनी नियोजनबध्द पध्दतीने ही हत्या नाही आत्महत्या वाटावी यासाठी रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता. 

घटनेची माहिती मिळताच तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस अधिक्षक विश्व पानसरे घटनास्थळावर दाखल झाले. मारण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टरचा स्पेंडल हा घटनास्थळपासून घराच्या वऱ्हाड्यांतच १५ फूट अंतरावर फेकलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिरोडाच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले.

९० वर्षाची म्हातारीच राहिली जिवंत

रेवचंद डोंगरु बिसेन यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन ह्या आजघडीला ९० वर्षाच्या आहेत. त्या समोरच्या खोलीत आपल्या खाटेवर झोपल्या होत्या. आरोपी मागच्या दारातून आले आणि त्यांनी या चौघांना संपविले तरी खेमनबाई यांना या घटनेचा सुगावा नसावा. या म्हाताऱ्या खेमनबाई यांना या घटनेची काय माहिती आहे यावरूनही पोलीस धागेदोरे जोडतील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी