शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सलंगटोला येथील आदिवासींना रस्ताच नाही

By admin | Updated: June 29, 2014 23:58 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील उशीखेडा येथून अडीच किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला या आदिवासी गावाला येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे या आदिवासीसोबत प्रशासन अन्याय करीत

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील उशीखेडा येथून अडीच किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला या आदिवासी गावाला येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे या आदिवासीसोबत प्रशासन अन्याय करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रत्येक छोट्या मोठ्या गावांना पक्के रस्ते तयार केले जाते. परंतु सलंगटोला या आदिवासी गावाला कुठल्याही मार्गाने जोडल्या गेले नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दल्ली किंवा उशिखेडा येथील शाळेत जाणे कठीण झाले आहे. या गावातील लोक व विद्यार्थी शेतातील धुऱ्याने येणे-जाणे करतात. पावसाळाच्या दिवसात तर धुऱ्याने जाणे सुध्दा कठीण होते. याबाबत दल्ली ग्राम पंचायतला वारंवार मागणी करूनही कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. लोकप्रतिनिधी अथवा कोणताही अधिकारी या गावाकडे ढुकूंनही पाहीले नाही, असा येथील लोकांना आरोप आहे. देशात आदिवासींना सर्वांगिण विकासासाठी वेगळा आदिवासी विकास विभाग असूनही आदिवासी गावाकडे दुर्लक्ष केला जातो, ही शोकांतिका आहे. या गावाकडे दुर्लक्ष केला गेल्याने त्यांचा विकास होण्याऐवजी विकास खुंटेला आहे. उशिखेडा, टेकरी ते सलंगटोला असा मार्ग तयार झाला, तर विद्यार्थी शाळेत जाणे पसंत करतील. अन्यथा विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहावे लागेल. निवडणूक काळात विविध पक्षांचे कार्यकर्ते धुऱ्या पाळीने जाऊन मतासाठी या गावाला भेट दिली. रस्त्याची समस्या नक्कीच दूर करू असे आश्वासन दिले होते.परंतु निवडणूक संपली की, ढुकूंनही पाहत नाही, अशी व्यथा सुज्ञ नागरिकांनी मांडली आहे. स्वातंत्र्याची ६० वर्ष लोटले. मात्र सलंगटोलाला रस्ता नसल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. (वार्ताहर)