शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आदिवासी बनले पोलिसांसाठी ‘लायजनिंग पर्सन’ होतेय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील आहे. या जिल्ह्यात ११४ गावे नक्षग्रस्त आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या न्यू बेस कॅम्प, मुरकुटडोह येथे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. आदिवासींच्या उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत देऊन त्यांचा राहणीमान व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देट्रायजंक्शनवर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : ग्राम विकासावर भर

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर न्यू बेस कॅम्प, मुरकुटडोह तयार करण्यात आले. या परिसरात राहणाऱ्या जवळपास तीन हजार लोकांना गोंदिया पोलिसांनी विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. पोलिसांकडून आदिवासींना होत असलेली मदत पाहून आदिवासी जनता हे पोलिसांसाठी लायजनिंग पर्सन म्हणून काम करीत आहेत.जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील आहे. या जिल्ह्यात ११४ गावे नक्षग्रस्त आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या न्यू बेस कॅम्प, मुरकुटडोह येथे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. आदिवासींच्या उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत देऊन त्यांचा राहणीमान व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. बांबू आधारित कुटीर उद्योगाचे प्रशिक्षण देणे, बांबू कुटीर उद्योगासंदर्भात प्रशिक्षण देण्यास मैत्री फाउण्डेशन नागपूर यांनी उत्सुकता दर्शविली आहे. मुरकुटडोह परिसरात असलेल्या तलावांमध्ये १० किलो मत्स्यबीज तलावात सोडले. धान बीज तसेच जीवाणू संवर्धक व उर्वरक वाटप केले. शेतकऱ्यांना शेतसंदर्भात मार्गदर्शन केले. गाव स्तरावर समित्या स्थापन करून ‘गावाचा विकास, आपला विकास’ या धर्तीवर गावाच्या विकासासाठी मुरकुटडोह क. १, २, ३, दंडारी, टेकाटोला या पाचही गावात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांचे मदतीने येथे भविष्यात करण्यात येणारी विकासात्मक कामे येथील जनतेस समजावून सांगणे व त्यांचे नियोजन करण्यात आले. प्रथमोपचारासाठी गावातच सोय करून दिली. शेतीचे नवीन तंत्रज्ञान व पद्धती सांगण्यात आल्या. यातून शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न आहे. परिसरातील नाल्यांवर बंधारे बांधून शेती सिंचन करण्यास मदत केली.  कंपोस्ट खतनिर्मिती, गांडूळ खतनिर्मिती केली. गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समित्यांकडून शाश्वत शेती करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी घेतला. आधुनिक पद्धतीने शेती करता यावी तसेच शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे म्हणून कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत एकूण २७० पोती धान बीज वाटप करण्यात आले. भाजीपालावर्गीय पिकांचे बियाणे वाटप केले. जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अदानी पॉवर प्लॅटच्या मदतीने मुरकुट डोह क. ३ येथे ५०० लीटर प्रतितास क्षमतेचा आरओ प्लॅण्ट बसविण्यात येणार आहे. आरोग्य शिबिर आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची मदत,  पाच गावांमध्ये २५० चादर वाटप करण्यात आल्या. जनतेमध्ये पोलिसांप्रति मदतीची व सौहार्दाची भावना निर्माण व्हावी म्हणून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, नोडल ऑफिसर परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ, सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले, मुरकुटडोह प्रभारी महेश पवार, पोलीस शिपाई विशाल सास्तुरे, गजानंद पोले अशा विविध कर्मचाऱ्यांनी नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना मदत केल्यामुळे आदिवासी जनता पोलिसांसाठी लायजनिंग पर्सन म्हणून काम करीत आहेत.

५५ टन वनस्पतीची मागणीआदिवासींच्या आर्थिक उन्नत्तीसाठी गोंदिया पोलिसांनी नवी मुंबई येथील धुतपापेश्वर आयुर्वेदिक या कंपनीशी चर्चा करून येथील आयुर्वेदिक कच्चा माल विकत घेण्याबाबत चर्चा केली. त्यांनी हा माल घेण्यास संमती दर्शविली आहे. औषधी वनस्पतींची आयुर्वेदिक औषधांसाठीचा कच्चा माल उपलब्ध करून देणे हा उपक्रम सुरू केला आहे. त्या कंपनीचे व्यवस्थापक जगताप यांनी वेगवेगळया अशा आयुर्वेदिक वनस्पतींची ५५ टनांची मागणी नोंदविली आहे. त्याची किंमत अंदाजे चार कोटी रुपयांच्या घरात आहे.‘त्या’ गावात झाली शाळा सुरूमुरकुटडोह परिसरातील सात गावांमध्ये प्राथमिक शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती. येथे प्राथमिक शाळांच्या इमारती असूनही त्या बंद अवस्थेत होत्या. त्या गावातील नागरिकांची बैठक आयोजित करून पोलिसांनी त्या बैठकीला गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी बोलावले होते. मुरकुटडोह क्रमांक १ व २ येथे दोन प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. या परिसरातील सर्व विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षणासाठी पिपरिया, सालेकसा व दरेकसा याठिकाणी जात होते.

 

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी