शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्यांवर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:39 IST

अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून आठ ठिकाणातून दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी (दि.५) करण्यात आलेल्या या कारवायांमुळे मात्र अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देजिल्हा पोलिसांची कारवाई : मोठ्या प्रमाणात दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून आठ ठिकाणातून दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी (दि.५) करण्यात आलेल्या या कारवायांमुळे मात्र अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.या धाडसत्रांतर्गत, दवनीवाडा पोलिसांनी देवेंद्र सलाम (२२), जयराम लिल्हारे (३५), अशोक चिखलोंडे (३५,सर्व रा. लोधीटोला) व सुरेश दगडे (४५,रा. धापेवाडा) या चार जणांकडून हातभट्टीची १६० लीटर दारू, १७ हजार ६६० रूपये रोख व मोटारसायकल असा एकूण ८३ हजार ६६० रूपयांचा माल जप्त केला.शहर पोलिसांनी गौतमनगरातील कालू उर्फ बुधराम कांबळे (५०) याच्याकडून देशी दारूच्या १६ बॉटल्स, मोहफुलाची ४ लीटर दारू असा एकूण १ हजार ३६० रूपयांचा माल जप्त केला.गंगाझरी पोलिसांनी ग्राम लेंडेझरी येथील हेतराम सलाम (४५) याच्याकडून मोहफुलाची १५० लीटर दारू, ४५० किलो मोहफुल तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ४२ हजार ८०० रूपयांचा माल जप्त केला. विशेष पथकाने डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत सचिन बिलोने (३१), खुशाल मडावी (३१,दोन्ही रा. सौंदड) यांच्याकडून मोफुलाची २५ लीटर दारू, ८५ किलो मोहफुल तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ५६ हजार १०० रूपयांचा माल जप्त केला. ग्रामीण पोलिसांनी बैरागीटोला येथील पामेश्वर पंधरे (२५) याच्याकडून हातभट्टीची १५ लीटर दारू, २२५ किलो मोहफुल तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १४ हजार २० रूपयांचा माल जप्त केला.रावणवाडी पोलिसांनी ग्राम कामठाटोली येथील सुनिता मस्करे (४६) हिच्याकडून १५० किलो मोहफुल व हातभट्टीची १० लीटर दारू असा १० हजार ५०० रूपयांचा माल जप्त केला. तर डुग्गीपार पोलिसांनी ग्राम डव्वा येथील चुन्नीलाल साखरे (६८) याच्याकडून विदेशी दारूच्या ३८ बॉटल्स व देशी दारूच्या ५२ बॉटल्स असा एकूण १० हजार ७४ रूपयांचा माल जप्त केला. आरोपींविरूद्ध महाराष्टÑ दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी