शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचे होणार ‘आॅडिट’

By admin | Updated: August 17, 2016 00:15 IST

शासनाने राज्यात एकाचवेळी दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

८० टक्के रोपे जगवण्याची जबाबदारी : संगोपनासाठी अधिकाऱ्यांवरही भार भंडारा : शासनाने राज्यात एकाचवेळी दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. लागवड केलेल्या रोपांपैकी ८० टक्के जगनलीच पाहिजेत, असे आदेश शासनाने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे यंदा नुसती वृक्ष लागवड करून भागणार नाही तर लावललेली रोपे जिवंत आहेत, याची शहानिशा होणार आहे. त्यामुळे संगोपणासाठी अधिकाऱ्यांना आता मोठा आटापिटा करावा लागणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. शासनाच्या वतीने वृक्ष लागवड हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. परंतु लावण्यात आलेली किती रोपे जगली, याकडे मात्र कुणाचेही लक्ष नसायचे. त्यामुळे राज्यातील वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पुढे आले. युती शासनाने यंदा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम चांगलाच मनवर घेतला. १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांना उद्दीष्ट दिले. वृक्ष लागवडीचा प्रचार, प्रसार करा, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय तथा शासनाचे इतरही विभाग, स्वयंसेवी संस्थांना वृक्ष लागवडीसाठी आणि त्याच्या संवधर्नासाठी प्रोत्साहित करा, असे आदेश शासनाने जिल्हा यंत्रणेला दिले होते. जिल्ह्याला लाखोंच्या घरात वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट होते. ते पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. प्रत्येक शासकीय विभागाला उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यासाठी रोपांची व्यवस्था देखील केली गेली. शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयमसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, सामाजिक वनीकरण व वनविभाग यांनी एकत्रित येवून वृक्षलागवडीचे लोकचळवळीत रूपातर करीत १ जुलै या एकाच दिवशी जिल्ह्यात लाखो वृक्षांची लागवड केली. कृषी, महसूल, नगर परिषद, जलसंपदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदीबरोबरच इतर शासकीय कार्यालयांनी देखील मोठ्या दिमाखात वृक्ष लागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने, जिल्हाभरात लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची नोंद केली आहे. काही दिवसानी या रोपाचे ‘आॅडिट’ होणार आहे. लावलेली ८० टक्के झाडे जगवण्याची जबाबदारी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांवर टाकली आहे. त्यामुळे या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना धावपळ करावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)