शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 22:21 IST

विना परवाना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरातील १२ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी (दि.१२) जप्तीची कारवाई केली. यामुळे खासगी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्दे१२ वाहने केली जप्त : उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विना परवाना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरातील १२ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी (दि.१२) जप्तीची कारवाई केली. यामुळे खासगी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.विद्यार्थ्यांची घरापासून शाळेत आणि शाळेपासून घरापर्यंत सुरक्षित वाहतूक करण्यासाठी परवानाधारक स्कूल बसमधून वाहतूक करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्यास त्याची माहिती शालेय प्राधिकरणाने संबंधित विभाग आणि न्यायालयाला देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची खासगी वाहनातून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. काही पालक सुध्दा थोडे पैसे वाचविण्याच्या नादात खासगी वाहन लावून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवितात. मात्र या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना नसल्याने एखाद्या वेळेस अपघात घडल्यास मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनासाठी नियमावली तयार केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने या वाहनाना विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी परवाना देताना सर्व गोष्टींची चाचपणी करुनच परवाना देण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या शालेय प्राधिकरणाने खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला देण्याचे निर्देश दिले आहे. महिनाभरापूर्वीच शाळांच्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात विना परवाना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू होती. उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवून विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी १२ खासगी वाहने जप्त केली. या कारवाईमुळे विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.तीन महिन्यांसाठी वाहनाचा परवाना निलबिंतविना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया १२ खासगी वाहनावर जप्ती कारवाई करुन या वाहनाचा परवाना तीन महिन्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने निलबिंत केला. त्यामुळे जप्त केलेली सर्व वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर जप्तीची धडक कारवाई केली जात आहे.पालकांनी सुध्दा आपल्या पाल्यांना परवाना नसलेल्या खासगी वाहनातून शाळेत पाठवू नये. तसेच शाळांनी सुध्दा याची काळजी घ्यावी.- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन गोंदिया.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसStudentविद्यार्थी