मुन्नाभाई नंदागवळी।लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळत असलेला येथील रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरण व फलाटाची उंची वाढविण्याचा विषय अखेर मार्गी लागला. ‘लोकमत’ने बातम्यांच्या माध्यमातून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची पावती मिळाली असून अखेर बाराभाटी रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला.अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकावरील अनेक समस्या प्रलंबित होत्या. प्रवाशांनी अनेकवेळा संबंधीत विभागासमोर समस्या मांडल्या पण अधिकारी लक्ष देत नव्हते. अशात प्रवाशांनी ‘लोकमत’चा आधार घेतला व खऱ्या अर्थाने समस्या उघडकीस आणून रेल्वे विभागाच्या नजरेत आणून दिल्या.‘लोकमत’ने बातम्यांच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाचे याकडे लक्ष केंद्रीत झाले व समस्यांवर दखल घेण्यात आली. परिणामी रेल्वे रुळापासून फलाटाची उंची वाढविण्यात आली असून सौंदर्यीकरण व पथदिवे लावण्यात आले, फलाटाचे रुंदीकरण करण्यात आले असून स्थानकावरील समस्या सोडविण्यास सुरूवात झाली आहे.एकंदरीत स्थानकावर विविध कामांना सुरूवात झाली असतानाच त्यातही कंत्राटदार कात्री लावत असल्याचे दिसत आहे. येथील कामात पूर्णपणे मुरुमाचा वापर न करता कंत्राटदाराने अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणी मातीचा वापर केल्याने बांधकामाच्या गुणवत्तेला घेऊन प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत अन्य समस्या लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, सुकळी व कवठा येथील गावकऱ्यांनी केली आहे.शौचालय बांधकामाची मागणीयेथील रेल्वे स्थानकावर शौचालय नसल्यामुळे महिला प्रवाशांची जास्तच अडचण होते. रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी शौचालय असणे गरजेचे आहे. या साध्या गोष्टीकडे रेल्वे विभागाचे लक्ष नसणे ही आश्चर्याची बाब आहे. करिता महिला-पुरूषांसाठी त्वरीत शौचालय बांधकाम करण्याची मागणी आहे. शिवाय,रेल्वे स्थानक परिसरात नियमित स्वच्छता करण्याची गरज आहे.
बाराभाटी रेल्वे स्थानकाचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST
अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकावरील अनेक समस्या प्रलंबित होत्या. प्रवाशांनी अनेकवेळा संबंधीत विभागासमोर समस्या मांडल्या पण अधिकारी लक्ष देत नव्हते. अशात प्रवाशांनी ‘लोकमत’चा आधार घेतला व खऱ्या अर्थाने समस्या उघडकीस आणून रेल्वे विभागाच्या नजरेत आणून दिल्या.‘लोकमत’ने बातम्यांच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाचे याकडे लक्ष केंद्रीत झाले व समस्यांवर दखल घेण्यात आली.
बाराभाटी रेल्वे स्थानकाचा कायापालट
ठळक मुद्देफलाटाची उंची वाढविली : नागरिकांच्या मागण्यांची होत आहे पूर्तता