शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

मोहफुलांतून कायापालट शक्य

By admin | Updated: February 12, 2016 02:09 IST

८ फेब्रुवारीला महसूल व वन विभागाच्या एका शासनादेशात मोहफुलांपासून महसूल मिळविण्याच्या अध्ययनासाठी एक समिती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यातून गेले अनेक प्रस्ताव : महसूल प्राप्तीसाठी बनणाऱ्या समितीच्या अहवालाची प्रतीक्षागोंदिया : ८ फेब्रुवारीला महसूल व वन विभागाच्या एका शासनादेशात मोहफुलांपासून महसूल मिळविण्याच्या अध्ययनासाठी एक समिती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने सदर समिती बनविण्यात येत आहे. या योजनेतून भविष्यात आदिवासींचा कायापालट होऊ शकते.मात्र गोंदिया वनविभागाच्या वतीने मोहफुलांपासून शरबत बनविणे, धान खरेदी केंद्रांप्रमाणेच मोहफूल खरेदी केंद्र सुरू करणे व मोहफुले खरेदी करण्याच्या प्रस्तावांना सदर समिती स्वीकार करू शकतील का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. जर या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करण्यात आले तर निश्चितच सदर अभ्यास समिती बनविण्याचे प्रयत्न सार्थक ठरतील. अन्यथा वनविभागाचे हे प्रयत्न केवळ देखावा बनूनच राहू शकतात.कधीकाळी गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक राहिलेले विरेंद्र तिवारी सध्या राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक आहेत. ८ फेब्रुवारीला त्यांनीच शासनादेश जाहीर केले आहे. सदर शासनादेशानुसार, वनविभागाच्या सचिवांची एक समिती गठित केली जात आहे. या समितीला पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल द्यायचा आहे. सदर समिती मोहफुलांपासून राजस्व मिळण्याच्या संदर्भात अध्ययन करेल. शासनादेशाच्या अंतर्गत अध्ययनासाठी काही बिंदू तयार करण्यात आले आहेत. यात मोहफुलांचे संकलन करणे, बाजाराची स्थिती पाहणे, मोहफुलांचा उपयोग व आर्थिक व्यवहाराचा अध्ययन सदर समितीला करावे लागणार आहे. याशिवाय आदिवासींना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी बनविण्यासाठी कोणते पाऊल उचलावे लागणार, मोहफुलांच्या रोपट्यांची नैसर्गिक वाढ करणे, अनियमन-नियमन सुलभ करणे, प्रक्रिया-उद्योग-रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना सांगणे व कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सिफारस करण्याचे अध्ययन सदर समितीला करावे लागणार आहे.जिल्ह्यात जवळपास पाच लाख मोहफुलांचे वृक्ष असल्याचे अंदाज बांधले जात आहे. मोहफुलांमध्ये अनेक औषधीय गुण आहेत. परंतु त्यांचा उपयोग हातभट्टीची दारू बनविण्यासाठीच अधिक प्रमाणात होतो. आजही गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनविली जाते व विकली जाते. मोहफुलांवर राज्य शासनाने प्रतिबंध लावले आहे. त्यानंतरही लपूनछपून मोठ्या प्रमाणात मोहफुलांचा संग्रह व विक्री होत आहे.सद्यस्थितीत गोंदिया वन विभागाच्या वतीने राज्य शासनाला प्रस्ताव बनवून पाठविण्यात आले आहेत. मोहफुलांपासून शरबत-जॅम बनविण्याच्या अतिरिक्त मोहफुलांची धानाप्रमाणेचे खरेदी करण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.शक्यतो काही आदिवासी आमदारांच्या दबावामुळे शासनाला सदर निर्णय घेण्यासाठी बाध्य व्हावे लागत आहे. आदिवासी आमदारांनी अनेक प्रस्ताव बनविले आहेत. मोहफुलांपासून आदिवासी समाजाचा कायापालट होवू शकेल, असे त्यांचे मानने आहे. सचिवस्तरीय समितीच्या अध्ययनानंतर काय अहवाल बाहेर ेयेतो, हे समजेल. सचिवस्तरीय समिती आदिवासींच्या पक्षामध्ये निर्णय घेते किंवा पूर्वीप्रमाणेच अंगूर-संत्र्यांसाठी मोहफुलांना डावलण्याची शिफारस केली जाते, हे काळच सांगेल. (प्रतिनिधी)लपून-छपून दारू बनविण्याचे प्रयत्नमोहफुलांपासून दारू बनविण्याचे लहाससहान कारखाने गावखेड्यांमध्ये बनलेले आहेत. ही दारू आताही लपूनछपूनच विकली जाते. दारूला खुलेआम विक्री करण्यासाठी प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहेत. परंतु राज्य शासनाच्या वक्रदृष्टीपासून वाचण्यासाठी कुणीही उघडउघड बोलत नाही. शासन बदलताच अनेक लोकांचे सूरही बदलले. आता सत्तापक्षाचे काही आमदार खुलेआम दारू बनविण्याची वकिली करीत आहेत. शक्यतो वन विभागाच्या माध्यमातून दारू बनविण्याचा प्रस्तावही बनविण्यात आला असावा. याबाबत अनेकप्रकारच्या चर्चा सुरू आहेत. जर मोहफुलांना राजाश्रम मिळाले तर छानच आहे. परंतु त्यांचा उपयोग सामान्य जनतेला नुकसान पोहोचविण्यासाठी होऊ नये, असे म्हटले जात आहे.