समाजबांधवांची मागणी : मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदनगोंदिया : येथील तहसील कार्यालयासमोर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जसानी बालक मंदिर (डॉ. आंबेडकर ग्रंथालय परिसर) येथे स्थानांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासदंर्भात आंबेडकरी समाजबांधवांनी ३० डिसेंबर रोजी नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना मागणीचे निवेदन दिले. शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याला जसानी बालक मंदिराच्या जागेत स्थानांतरीत करण्याला घेऊन मागील कित्येक काळापासून वाद सुरू होता. यावर मात्र या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने व आंबेडकरी समाजबांधवांच्या भावना लक्षात घेत पुतळा जसानी बालक मंदिराच्या जागेवर स्थानांतरीत करण्याचा प्रस्ताव ७ जुलै रोजी पार पडलेल्या आमसभेत ठेवण्यात आला होता. तर या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती. त्यानुसार बाबासाहेबांच्या पुतळा त्वरीत स्थानांतरीत करण्यात यावा या मागणीला घेऊन माजी नगराध्यक्ष सुशिला भालेराव यांच्या नेतृत्वात ३० डिसेंबर रोजी मुख्याधिकारी मोरे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मोरे यांनी, जसानी बालक मंदिराच्या जागेवर पुतळा स्थापनेला घेऊन येत असलेल्या अडचणी सोडविल्या जाणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बी.जी.डोंगरे, प्रफुल भालेराव, सुरेंद्र खोब्रागडे, के.डी.सहारे, व्ही.डी.वासनीक, एल.टी.शामकूवर, यु.डी.गजभिये, रामदास भोतमांगे, एस.आर.चौरे, जयंत कुंभलवार, श्याम चौरे, राजू दोनोडे, पौर्णिमा वालदे, कुंदा भास्कर, बसंत गणवीर, ए.बी.बोरकर, गज्जू नागदवने व अन्य आंबेडकरी समाजबांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बाबासाहेबांचा पुतळा चौकातून स्थानांतरित करा
By admin | Updated: December 30, 2014 23:38 IST