शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाश्यांची लूट करणारी टोळी सक्रिय

By admin | Updated: October 26, 2014 22:43 IST

सध्या रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. आपण आपल्या कुटुंबासह लोकल रेल्वेगाडीने प्रवास करीत असाल तर जरा सतर्क व्हा. आपल्यासोबत असलेल्या साहित्याकडे नजर ठेवा. आपल्याला गंडविणाऱ्या

गोंदिया : सध्या रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. आपण आपल्या कुटुंबासह लोकल रेल्वेगाडीने प्रवास करीत असाल तर जरा सतर्क व्हा. आपल्यासोबत असलेल्या साहित्याकडे नजर ठेवा. आपल्याला गंडविणाऱ्या टोळीतील तरुण गर्दीचा फायदा घेऊन लुटण्याच्या बेतात आहेत. या लोकल रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षा दल किंवा रेल्वे पोलिसांची गस्त नसल्याने प्रवाशांना लुटले जात आहे. नागपूर-रायपूरच्या दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल गाड्यांमध्ये या टोळीतील सदस्य सक्रिय आहेत. गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करणारे हे टोळीतील सदस्य सहकुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या सामानावर, महिलांच्या दागिन्यांवर तसेच पुरुषांच्या पाकिटावर नजर ठेवत असतात. या टोळीत सात ते दहा जणांचा समावेश आहे. तरुण वयातील असलेले हे धडधाकड सदस्य प्रवाशांना दमदाटी देण्यातही मागे-पुढे पाहत नाही. गर्दीचे ठिकाण पाहून आपल्याला कुठे हात साफ करता येईल, याच्याच बेतात असलेले हे सदस्य सहकुटुंब प्रवास करणाऱ्या कुटुंबालाच गंडविण्याचा प्रयत्नात असतात. मागच्या वर्षी दिवाळी तोंडावर असताना पेपर गँग सक्रिय झाली होती. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या पेपर गँगला वर्धा येथील पोलिसांनी अटक केली होती. यावर्षी मात्र अशाच प्रकारची प्रवाशांना लुटणारी गँग सक्रिय झाली आहे. मात्र या गँगमधील सदस्य सामान्य प्रवाशांसारखेच राहत असल्याने प्रवाशांना ते सहजासहजी ओळखणे कठीण आहे. मात्र प्रवाशांसोबत गर्दीचा फायदा घेऊन उभे राहणारे ते सदस्य दोन ते चार वेळा त्या डब्यातील प्रवाशांच्या सामानाकडे, महिलांच्या दागिन्यांकडे किंवा एखाद्याच्या फुगलेल्या पाकिटाकडे लक्ष घालतात. बहुतेकदा ते गाडीतील प्रवाशांशी एखाद्या विषयावर चर्चाही करतात. एखाद्या साधारण विषयावर चर्चा करण्यात मशगूल असलेल्या प्रवाशांच्या सामानावर त्याच टोळीतील एक सदस्य त्यांची नजर चुकवून हात साफ करीत असते. याच टोळीतील दोन सदस्य डब्यातील दोन कोपऱ्यांवर राहून सुरक्षा दलाचे जवान किंवा रेल्वे पोलीस गस्त तर घालत नाहीत याकडे लक्ष ठेवतात. डब्यातील प्रवाशांना धमकावून त्यांना लुटणे ही बाब या टोळीतील सदस्यांनी हेरून धरली. या टोळीतील सदस्य प्रवाशांची सुटकेस उघडण्यासाठी नकली किल्लीचाही वापर करीत असतात. डब्यातील गर्दी पाहून गाडी फलाटावर थांबताच उतरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ब्लेडच्या साहाय्याने कापून पळवीत असतात. प्रवाशांचे सुंदर कपडे पाहून ते प्रवासी गरीब की श्रीमंत असा अंदाज व्यक्त करूनही ते चोरीच्या घटना घडवीत असतात. एखाद्या महिलेने अंगावर दागिने घातले नाही म्हणजेच तिने आपले दागिने सुटकेसमध्ये ठेवले असावेत, असा ते ठाम निर्धार करून त्या महिलेच्या सुटकेसवर ते हात साफ करीत असतात. रेल्वेतील लोकल गाड्यांमध्ये अनेक प्रवाशांना लुटल्याची प्रकरणे गोंदिया रेल्वे पोलिसांकडे तक्रार म्हणून गेली. परंतु रेल्वे पोलिसांना या टोळीतील सदस्यांना पकडण्यात अद्याप यश आले नाही. रेल्वे पोलिसांची किंवा रेल्वे सुरक्षा दलाची या लोकल गाड्यांमध्ये गस्त नसल्याने ते सक्रिय सदस्य पोलिसांच्या हाती लागले नाहीत. (तालुका प्रतिनिधी)