शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार प्राप्तीसाठी प्रशिक्षण आवश्यक

By admin | Updated: July 18, 2015 01:18 IST

वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक अहे.

विजय सूर्यवंशी : कौशल्य विकास कार्यकारी समितीची सभागोंदिया : वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक अहे. युवक-युवती यामधून स्वावलंबी होण्यासोबत रोजगार प्राप्त करण्यासाठी सक्षम होतील, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १५ जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.डॉ. सूर्यवंशी म्हणाले, विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. औद्योगिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असताना सुद्धा औद्योगिक क्षेत्राला सुद्धा कुशल मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना सुद्धा औद्योगिक क्षेत्राला सुद्धा कुशल मनुष्यबळाची कमतरता भासते. औद्योगिक क्षेत्रात ज्या कामासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या कौशल्यप्राप्त कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना योग्य ते शिक्षण देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी स्थानिक पातळीवर रोजगार प्राप्त करण्यासाठी त्यांना बांबूवर आधारित साहित्य व वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.सभेमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम २०१४- १५ या वर्षात ४५० मुलामुलींना आदरातिथ्य, बांधकाम, आॅटोमोबाईल्स या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली. ५० युवक-युवतींची तुकडी बांधकाम व आदरातिथ्य या प्रशिक्षणासाठी लातूर व औरंगाबाद येथे पाठविण्यात आल्याची माहिती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक भोयर यांनी प्रास्ताविकेतून दिली. जागतिक युवा कौशल्य दिनाचा औचित्य साधून जिल्ह्यातील अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे सहायक महाव्यवस्थापक डॉ. विजय गंधेवार, वसंत फाईन आर्ट लिथोवर्कचे संचालक सुनील धोटे, एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष हुकुमचंद अग्रवाल, एमआयडीसीमधील सोना उद्योग लि.चे. वधवा, लाख इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष गजानन अग्रवाल, माहेश्वरी साल्व्हेंट उद्योग व्यवस्थापक आनंद तिवारी या उद्योजकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या गोंदिया येथील गणेश शिक्षण संस्थेचे संचालक गजानन उमरे, गोरेगाव येथील पार्वती बहुउद्देशिय संस्थेचे संचालक लिलेश्वर रहांगडाले, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यक्रम समन्वयक विशाल मेश्राम आणि तिरोडा येथील आनंद मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक आनंद गहरवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)