शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

१०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 20:54 IST

कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा, गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्रात १७ व १८ मे रोजी किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील १०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्र हिवरा : कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा, गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्रात १७ व १८ मे रोजी किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील १०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. आत्मा गोंदिया कार्यालयाचे सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ.व्ही.एस.साखरकर यांनी केले. आर.डी.चव्हाण यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करतांना घेण्यात येणारी काळजी व विषबाधा झाल्यावर करण्यात येणारे प्रथमोपचार या विषयांवर मार्गदर्शन केले.एस.जी.पवार यांनी फवारणी यंत्राची निगा व काळजी यावर मार्गदर्शन केले. के.सी.गांगडे यांनी कीटकनाशकांमुळे मनुष्यावर होणारे दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले. संचालन एस.जी.पवार तर आभार के.सी.गांगडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर.टेंभूरकर, जी.यु.काळुसे व एम.व्ही.भोमटे यांनी सहकार्य केले.