शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातील गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जिवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ठिकाणी एकत्र करतात. नंतर भूत गांजा नावाचे गवत वनस्पती ठेवतात. सायंकाळच्या सुमारास सर्व गावकरी गावातील गुरे-ढोरे त्या शेण, गवतावरून नेताना शेण (गोवर्धन) पूजन केली जाते. यावरून सर्व गुरे हाकलली जातात.

ठळक मुद्देग्रामीणांची आस्था : परंपरेला विश्वासाची जोड

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे गायगोधन. या दिवशी लोक मोठ्या आस्थेने गोवर्धन पूजा करतात. लोककलेची संस्कृती आणि आस्थेने दर्शन यावर्षीही गोवर्धन पुजेच्या निमित्ताने सोमवारी (दि.२८) ग्रामीण भागात पहायला मिळाले.ही पूजा ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातील गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जिवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ठिकाणी एकत्र करतात. नंतर भूत गांजा नावाचे गवत वनस्पती ठेवतात. सायंकाळच्या सुमारास सर्व गावकरी गावातील गुरे-ढोरे त्या शेण, गवतावरून नेताना शेण (गोवर्धन) पूजन केली जाते. यावरून सर्व गुरे हाकलली जातात.सांस्कृतिक लोककला प्रकार दंडार नृत्य या ठिकाणी सादर केले जाते. यातून मनोरंजनाबरोबर प्रबोधन केले जाते. याच्या ओळी, गाण, गीत यामध्ये कथा, पथनाट्य सादर केली जातात. अशाच प्रकारे सर्व ग्रामीण भागामध्ये गोवर्धन पूजेची परंपरा असते. या दिवसापासून खेड्यापाड्यामध्ये मंडई या कार्यक्रमाचे आयोजनाला सुरूवात होते. यादरम्यान नाटकाचे आयोजन केले जाते. दंडारीचे आयोजन केले जाते, एक सामाजिक संकल्प बांधून एकोपा निर्माण करणे हा महत्त्वाचा भाग आहे. हीच समाज संस्थेची खरी संपत्ती समजली जाते.यावर्षी शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंताग्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह नसला तरी या सणाची परंपरा यावर्षीही कायम होती. गोंदियात शहरालगत गोविंदपूर, छोटा गोंदिया परिसरात गायगोधनादरम्यान हेल्यांची स्पर्धा झाली.

टॅग्स :Diwaliदिवाळी