शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

गोंदियातही होणार पर्यटन महोत्सव

By admin | Updated: January 26, 2016 02:31 IST

जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना येथील पर्यटनस्थळांची ओळख करून देण्यासाठी लवकरच

गोंदिया : जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना येथील पर्यटनस्थळांची ओळख करून देण्यासाठी लवकरच पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी ५० लाखांच्या निधीचे नियोजनही केले जात असून सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले बडोले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी. गावडे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पो.अधीक्षक मिना यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/ आदिवासी उपयोजना (ओटीएसपी) सन २०१६-१७ च्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली. यात कमाल आर्थिक मर्यादेनुसार सर्वसाधारण योजनेत ८६ कोटी ५७ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेत ३८ कोटी ६५ लाख, आदिवासी उपयोजनेत ५९ कोटी ५१ लाख, ओटीएसपी योजनेत ८ कोटी २० लाख ६२ हजार तर माडा योजनेत ७ कोटी ५८ लाख ८३ हजार रुपयांच्या प्रस्तावित नियतव्ययाला मंजुरी दिली.या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन १०१५-१६ अंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेअंतर्गत ७ कोटी १८ लाखाच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यावेळी डिसेंबर २०१५ अखेर झालेल्या आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यात आतापर्यंत ४० टक्के निधी खर्च झाल्याचे दिसून आले. उर्वरित ६० टक्के निधी ३ महिन्यात खर्च करायचा असून त्यासाठी पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. आदिवासी उपयोजनेत सर्वाधिक ६१.७२ टक्के निधी खर्च झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आरोग्य व पेयजलासाठी भरीव तरतूद४या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांकरिता शासनाने निर्देशित केल्यानुसार नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले. मृद व जलसंधारणाकरिता मागील वर्षीपेक्षा जास्त तरतूद प्रस्तावित करण्यात आली. सर्वसाधारण योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्याकरिता तसेच राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाकरिता भरीव तरतूद करण्यात आली. अंगणवाडी बांधकामाकरिता प्राधान्य, उर्जा विकासाकरिता यंत्रणेच्या मागणीनुसार नियतव्यय प्रस्तावित, पर्यटन विकासात पुरेशी तरतूद, नाविन्यपूर्ण योजनांकरिता शासन निर्देशानुसार नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले.नियोजन समितीच्या सभेतील महत्त्वाचे निर्णय ४अत्यल्प व अल्पभूधारकांकडील कर्जवसुली करण्यात येवू नये. ४१४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून अंगणवाडी दुरुस्तीची कामे प्राधान्याने घ्यावीत.४जड वाहतुकीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाने संयुक्तरित्या कार्यवाही करावी.४जलयुक्त शिवारमध्ये निवड केलेल्या गावातील नागरिकांनी सांगितलेली सर्व प्रकारची जलसंधारणाची कामे करावी.४लघु पाटबंधारे, स्थानिक स्तरकडे पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे जलसंधारणाची ० ते १०० हेक्टरपर्यंतची कामे जिल्हा परिषदेने करावी.४आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या लाखेवर प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट तयार करावे.४मांडोदेवी पर्यटन स्थळ, नागरा पर्यटन स्थळ, कचारगड पर्यटन स्थळ या ३ स्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देणेबाबत शिफारस करणे.४गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळ विकासासाठी पर्यटन प्रवास शिबिर आयोजित करुन त्यासाठी योग्य ठिकाणी स्थानिक जनतेची/कलाकारांची नृत्ये, त्यांचेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तु अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी वेब स्थळावर आणणे. पर्यटन जिल्हा म्हणून देणार ओळख४गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनाच्या ठिकाणांची ओळख जिल्ह्याबाहेरील लोकांना करून देणे गरजेचे आहे. त्यासाठीच पर्यटन महोत्सवाची कल्पना मांडण्यात आली. यात सर्व आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये तसेच जिल्हा निधीतून पैसे घेऊन या महोत्सवासाठी ५० लाखांची तरतूद केली जाणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बडोले यांनी सांगितले. या महोत्सवात पर्यटकांना वेगवेगळ्या पर्यटनस्थळी जाण्या-येण्यापासून लोककलांच्या सादरीकरणातून त्यांचे मनोरंजन करण्यापर्यंतची तरतूद केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळी विविध सोयी उपलब्ध करून देऊन दोन वर्षात गोंदियाला पर्यटन जिल्हा म्हणून राज्यात ओळख दिली जाईल असे ना.बडोले म्हणाले.