शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पर्यटन विकासाला चालना मिळेल

By admin | Updated: January 31, 2015 01:45 IST

गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. अनेक पर्यटन व तीर्थस्थळे जिल्ह्यात आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक यावे यासाठी ...

गोंदिया : गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. अनेक पर्यटन व तीर्थस्थळे जिल्ह्यात आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक यावे यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलक महत्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यातील पर्यटन विकासाला या फलकांमुळे निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.सौंदडजवळील राष्ट्रीय महामार्गालगतच्या बोपाबोडी मार्गावर जिल्हा पर्यटन समितीने जिल्हा माहिती कार्यालयाला दिलेल्या निधीतून तयार करण्यात आलेल्या पहिल्या रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलकाचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा नियोजन अधिकारी बी.एस. घाटे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. राजेंद्र जैन, उपविभागीय अधिकारी डी.एन. सोनवणे, सडक अर्जुनीचे तहसीलदार एन.जे. उईके, वन्यजीव विभागाचे सहायक वनरक्षक खंडाते, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अश्वीन ठक्कर, समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, वुई दि एलीमेंटसचे संचालक आशिष उके उपस्थित होते.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जास्तीत जास्त संख्येत पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्राला भेटी देणार असल्यामुळे अनेकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्राची सचित्र माहिती असलेल्या घडिपुस्तिका, पॉकेट बूक व कॅलेंडर्सची पाहणी करून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलकावर जिल्ह्यातील प्रतापगड, इटियाडोह, धासगड, तिबेटीयन शरणार्थी शिबिर गोठणगाव, नवेगाव -नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, चुलबंद प्रकल्प, हाजराफॉल, बोदलकसा प्रकल्प, मांडोदेवी, कचारगड गुफा, पांगडी जलाशय, शिवमंदिर नागरा, कामठा आश्रम, परसवाडा आदी पर्यटन व तीर्थक्षेत्राचा स्थळदर्शन नकाशा किलोमिटर अंतरासह दर्शविला आहे. नवेगावबांध, कचारगड, इटियाडोह, नागझिरा आणि दुर्मिळ सारस पक्ष्यांचे अस्तीत्व असलेले परसवाडा हे ठिकाण फोटोसह दाखविण्यात आले आहे. विशेषत: रात्रीला महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांचे लाईट रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलकावर पडल्यानंतर हा फलक अधिक आकर्षक दिसेल.जिल्ह्यात हे फलक गोंदिया- बालाघाट रस्त्यावरील कोरणी फाटा येथे, देवरी-राजनांदगाव राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर ग्रामपंचायत जवळ, कोहमारा-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील दुध डेअरी जवळ, गोंदिया-तिरोडा सीमेवर, गडचिरोली -गोंदिया सीमेवर गौरनगर येथे, इटियाडोह येथे, नवेगावबांध येथे, सानगडी-नवेगावबांध सीमेवर आणि नागपूर येथे सुद्धा हे फलक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त पर्यटन व तिर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी येतील. (जिल्हा प्रतिनिधी)