शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे उद्या सामूहिक राजीनामे

By admin | Updated: June 29, 2014 23:57 IST

मॅग्मो (महाराष्ट्र राज्य राजपत्रिक वैद्यकीय अधिकारी संघटना) संघटनेने सन २०११ चे आपले स्थगित असहकार कामबंद आंदोलन २ जून २०१४ रोजी सुरू केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत

मॅग्मोचे आंदोलन : कामकाजावर बहिष्कार, आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यतागोंदिया : मॅग्मो (महाराष्ट्र राज्य राजपत्रिक वैद्यकीय अधिकारी संघटना) संघटनेने सन २०११ चे आपले स्थगित असहकार कामबंद आंदोलन २ जून २०१४ रोजी सुरू केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत संघटनेशी चर्चा करून १० दिवसांत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र जून महिना लोटूनही त्यांचे कोणतेच प्रस्ताव कॅबिनेट मंजुरीसाठी पाठविले नाही. त्यामुळे मॅग्मो संघटना १ जुलैपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करून सर्व वैद्यकीय अधिकारी राजीनामे देणार आहेत. गोंदिया जिल्हा संघटना केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात धरणे व निदर्शने करणार आहे. त्यामुळे आरोग्य सेवाच विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील जवळपास १२ हजार वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांची मॅग्मो ही संघटना आहे. राज्यातील जवळपास ८० टक्के जनतेला आरोग्य सेवा पुरविणाऱ्या व ग्रामीण भागत कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. भक्कम पाठपुरावा व चर्चा करूनही संघटनेचे प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबितच आहेत. शासन आश्वासनापलिकडे काहीच करीत नाही, असा या संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे २ जूनपासून संघटनेने सन २०११ चे स्थगित कामबंद आंदोलन पुन्हा सुरू केले होते. या आंदोलनाची त्वरीत दखल घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संघटनेला चर्चेसाठी बोलाविले. चर्चेत मुख्य सचिवांसह सर्व प्रमुख खात्यांच्या सचिवांचा समावेश होता. यात मागण्यांची अंमलबजावणी १० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व संघटनेस आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले व २० जून २०१४ पर्यंत शासनास वेळही दिला. मात्र संघटनेच्या मागण्यांच्या अंमलबजावणीचा कोणताच प्रस्ताव कॅबिनेट मंजुरीसाठी अद्याप ठेवण्यात आला नाही. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्याप्त झाला असून १ जुलैपासून मॅग्मो संघटना पुन्हा ‘बेमुदत काम बंद असहकार आंदोलन’ करणार आहे. मॅग्मोचे राज्याध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड व सरचिटनिस डॉ. प्रमोद रक्षणवार हे आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणावर बसणार आहेत. या आंदोलनांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात १ जुलैपासून जिल्हा रूग्णालयात बेमुदत धरणे व निदर्शने केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी व राज्याचे आरोग्य सेवा संचालक हे १ जुलै रोजी सामुहिक राजीनामे देऊन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सन २००९-१० मध्ये सेवा समावेश झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्ष लाभ मिळावे, अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट-अ व अस्थायी बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट-ब यांचे सेवा समावेशन करावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावे, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ द्यावा, या अधिकाऱ्यांना उच्चवेतन (डीएससीपी) लागू करावे या व इतर मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)