शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

आरोग्य सेविकांना टोलवाटोलवी

By admin | Updated: June 8, 2014 00:02 IST

कामावर असलेल्या संपूर्ण २८0 आरोग्य सेविकांच्या कामांचे मुल्यमापन करण्याचे खुले आव्हान देत ४४ आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन सुरू आहे. रखरखत्या उन्हात त्या आपल्या हक्कासाठी मैदानात उतरल्या असून

गोंदिया : कामावर असलेल्या संपूर्ण २८0 आरोग्य सेविकांच्या कामांचे मुल्यमापन करण्याचे खुले आव्हान देत ४४ आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन सुरू आहे. रखरखत्या उन्हात त्या आपल्या हक्कासाठी मैदानात उतरल्या असून २ जून पासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान त्यांनी अधिकार्‍यांची भेट घेऊन पुनर्नियुक्तीची मागणी केली. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी त्यांची टोलवा-टोलवी करीत असल्याचे या आरोग्य सेविकांचे म्हणणे आहे. यामुळेच आता सोमवारपासून (दि.९) या ४४ आरोग्य सेविका साखळी उपोषण सुरू करणार आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविकांची २३६ पदे मंजूर आहेत. परंतु आरोग्य विभागात २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पीआयपी अंतर्गत मंजूर २३६ तर कंत्राटी ४४ आरोग्य सेविकांच्या संख्येवरून नेहमीच काही ना काही वाद निर्माण होतो. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. भिमराव मेश्राम यांनी आपल्या कार्यकाळात अधिकच्या आरोग्य सेविकांना नियुक्ती दिल्याने हा वाद निर्माण  झाला आहे. यामुळे मात्र जुन्या आरोग्य सेविका अडचणीत आल्या आहेत. परिणामी जिल्हा परिषदेने ९६ आरोग्य सेविकांना सेवेतून कमी केले होते. यावर मात्र आरोग्य सेविकांच्या आंदोलना नंतर ४४ आरोग्य सेविकांना पुन्हा कामावर  घेण्यात आले. मात्र आता त्यांनाही मार्च नंतर पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नसल्याने त्या अधांतरीच आहेत. पुनर्नियुक्ती द्यावी या मागणीसाठी या ४४ आरोग्य सेविकांचे २ जून पासून धरणे आंदोलन सुरू आहे. आपल्या आंदोलनांतर्गत त्यांनी २८0 आरोग्य सेविकांचे मुल्यमापन करण्याचे जिल्हा परिषदेला म्हटले.  तर त्यानंतरही एक आशा बाळगून त्या अधिकार्‍यांना भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अधिकारी या आरोग्य सेविकांना  यांच्याकडे-त्यांच्याकडे पाठवून त्यांची टोलवा-टोलवी करीत आहेत.एवढेच नव्हे तर आंदोलनावर बसलेल्या या आरोग्य सेविकांना अपमानास्पद वागणुकीचा सामनासुद्धा करावा लागत असल्याचे या आरोग्य सेविकांचे म्हणणे आहे.  कुणाचा अधिकार न हिरावता कामांचे मुल्यमापन करवून घेण्याची तयारी या ४४ आरोग्य सेविकांनी दर्शविली आहे. मात्र अधिकारी त्यांचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अशात आता लढा सुरू झाला असून मधात सोडता येत नसल्याने  आपल्या न्यायासाठी सोमवारपासून (दि.९) साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे आरोग्य सेविकांनी सांगीतले.  (शहर प्रतिनिधी)