शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

आजही जपतात बाबासाहेबांच्या ऋणानुबंधाच्या आठवणी

By admin | Updated: April 14, 2016 02:22 IST

जगाच्या इतिहासात प्रमुख सात विद्वानांपैकी एक, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आणि विश्वभूषण, भारतरत्न, क्रांतिसूर्य व भारत भाग्यविधाता ...

देवानंद शहरे गोंदियाजगाच्या इतिहासात प्रमुख सात विद्वानांपैकी एक, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आणि विश्वभूषण, भारतरत्न, क्रांतिसूर्य व भारत भाग्यविधाता अशा विविध संबोधनांनी ओळखल्या जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६२ वर्षांपूर्वी या जिल्ह्याचे खासदार होणार होते. पण नियतीच्या चक्रात ते भाग्य या जिल्ह्यातील नागरिकांना लाभले नाही. पण त्या काळात बाबासाहेबांशी निगडीत जपलेल्या ऋणानुबंधाच्या आठवणी आजही काही जुन्या मंडळींच्या स्मरणात आहेत.ज्यांना अख्ख्या जगात ‘सिम्बॉल आॅफ नॉलेज’ असे संबोधिले जाते त्यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस’ म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. अशा महामानवाचा गोंदिया-भंडारा जिल्ह्याशी काय ऋणानुबंध आहे याची कल्पना कदाचित आजच्या नवीन पिढीला नसेल. पण भारतीय संविधानाचे जनक असलेल्या डॉ.बाबासाहेबांचे पावन पदस्पर्श गोंदिया-भंडारा जिल्ह्याला (तत्कालीन भंडारा जिल्हा) दोन वेळा झाल्याचे सांगितले जाते. क्रांतिकारी व विद्रोही व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणाऱ्या डॉ.आंबेडकरांनी निवडणुकीच्या वेळी या जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. गोंदियात ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यांना त्यावेळचे विश्रामगृहाचे खानसामा हुसन चैतू डोंगरे (कन्हारटोली) यांनी त्यांच्या पसंतीचे झुनका भाकर बनवून दिले होते. १९५४ ची ती लोकसभा निवडणूक होती. तत्कालीन भंडारा जिल्हा हा मागास जिल्हा म्हणूनच ओळखला जात होता. या भागाला विकासाच्या प्रवाहात आणावे म्हणूनच कदाचित बाबासाहेबांनी या जिल्ह्याची निवड केली होती. निवडणूक प्रचाराला बाबासाहेबांचे भंडाऱ्यात आगमन झाले. तुमसर रस्त्यावरील कोलते यांच्या बंगल्यावर (सध्या अशोका ले लँड कंपनीचे प्रतीक्षालय) त्यांचा मुक्काम होता. सोबत माईसाहेब आंबेडकर होत्या. या बंगल्यात निवडणुकीची खलबत्ते चालत. काँग्रेसविरोधात प्रज्ञा समाजवादी पक्ष व शेड्युल कास्ट फेडरेशन मित्रपक्ष होते. प्रचारादरम्यान बाबासाहेबांनी ‘हरलो तरी चालेल, पण मी राज्यघटना लिहिली. मत गोठवणे घटनाविरोधी आहे. माझ्या अनुयायांनी नितीमूल्यांच्या विरोधात जावू नये’, असा पवित्रा घेतला होता. निवडणुकीत बाबा हरले, पण नितीमत्तेचा धडा देवून गेले. मात्र बाबासाहेब जिंकले असते तर कदाचित त्याच काळात अख्ख्या गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा कायापालट झाला असता. बाबासाहेबांना देवाप्रमाणे मानणारी दलित मंडळी दूरदुरून दोन दिवसांपासून भंडाऱ्यात येवून त्यांचे भाषण व दर्शनासाठी थांबली होती. त्यावेळी भंडाऱ्यातील सर्व सभा गांधी चौक (टॉऊन हॉल) मध्ये होत असत. गर्दीच्या अपेक्षेने त्यांच्या भाषणाला मन्रो हायस्कूलचे खेळाचे पटांगण निवडण्यात आले होते. त्यावेळी प्रचंड गर्दी होती. काही जण वृक्षांवर चढून भाषण ऐकत होते. भाषणानंतर पाया पडणाऱ्यांना हातातील काठीने बाबा नाईलाजाने दूर करीत होते.अखेर तडजोड नाकारलीनिवडणुकीदरम्यान अशोक मेहतांचे खासगी सचिव डॉ.शांतिलाल व निवडणूक प्रचारप्रमुख अ‍ॅड.ज्वालाप्रसाद दुबे चर्चेकरिता बाबासाहेबांना भेटायला भेले होते. शेड्युल कास्ट फेडरेशनच्या मतदारांचे दुसरे मत अशोक मेहता यांना मिळावे आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या मतदारांचे दुसरे मत बाबासाहेबांना मिळावे, अशी तडजोड सूचविण्यात आली होती. मात्र कार्यकर्ते म्हणाले, ‘आम्ही निश्चित सांगतो की शेड्युल कास्ट फेडरेशनच्या मतदारांचे दुसरे मत प्रजा समाजवादी पक्षाला मिळेल. पण प्रजा समाजवादी पक्षाच्या मतदारांचे दुसरे मत शेड्युल कास्ट फेडरेशनला मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही तडजोड करू नये, असे म्हटले. पण बाबासाहेबांनी नकार दिला व हारलो तरी चालेल, पण मत गोठविणे घटनाविरोधी व नितीमूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.अन् बाबासाहेबांनी खाल्ली भाकरीभंडाऱ्यात आल्यावर बाबासाहेबांना जोरात भूख लागली होती. तेथे कोणतेही प्रशस्त हॉटेल नव्हते. त्यांची गाडी दिनकरराव रहाटे यांच्या घराकडे वळली. दिनकररावांचे घर गल्लीत होते. गाडी रस्त्यावर थांबवून ते चालत गेले. दिनकररावांनी एका डब्यात भाकरी दिली. कोलतेंच्या वाडीवर जावून बाबासाहेबांनी जेवन केले. त्यावेळी दिनकरराव ‘सुदाम्या घरचे पोहे’ म्हणून ही आठवण सांगत असत. अशाच धावपळीत रहाटे यांच्या घराशेजारील वाचनालयालाही बाबासाहेबांनी भेट दिली. कार्यकर्त्यांचा सायकलवरून प्रचारसमता सैनिक दलाचे लाल शर्ट घातलेले सैनिक बाबासाहेबांच्या प्रचारासाठी जीवाचा आटापिटा करीत होते. आपल्या भाषणात बाबासाहेब स्भाभिमानाने म्हणत, ‘माझ्या एका शब्दाने हे हिंदूस्थानला आग लावू शकतील.’ बाबासाहेबांच्या प्रचारासाठी अनेक कार्यकर्ते गावोगावी प्रचारासाठी सायकलने फिरत होते. त्यावेळी अशोक मेहता व बाबासाहेबांच्या प्रचारार्थ जयप्रकाश नारायण, ना.ग. गोरे, एस.एम. जोशी हेसुद्धा जिल्ह्यात आले होते.