तिरोडा : ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारी रोजी असल्याने तिरोडा पोलीस अवैध दारूच्या दुकानांवर धाड घालत आहेत. तिरोडा पोलिसांनी बुधवारी (दि.१३) पुन्हा ४ ठिकाणी धाड घालून ४ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातील श्यामराव श्रीराम झाडे (४५) याच्याकडून १५०० किलो मोहफूल, किंमत १ लाख २० हजाराचा माल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई याच परिसरात पूर्णा प्रल्हाद तांडेकर (४५) १४०० किलो मोहफूल, किंमत १ लाख १२ हजारांचा माल जप्त करण्यात आला. तिसऱ्या कारवाईत सूरज प्रकाश बरीयेकर याच्याकडून १८०० किलो मोहफूल, किंमत १ लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. चौथी कारवाई याच परिसरातील आहे. संतोष रमेश बरीयकेर याच्याकडून १३०० किलो मोहफूल, किंमत १ लाख ४ हजार रुपये असा एकूण ४ लाख ८० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
तिरोडा पोलिसांनी केला ४ लाख ८० हजारांचा माल जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST