शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा पोलिसांची ऑनलाईन मोबाईल सट्ट्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

शास्त्री वॉर्डातील मनोहर तरारे यांनी आपल्या घरी घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावून, घराच्या समोरील दाराला बाहेरून कुलूप लावून वरच्या माळ्यावर ऑनलाईन मोबाईलवर सट्टा लावून जुगार खेळवित होता. या माहितीवरून पंचाच्या समक्ष २६ ऑक्टोबरच्या रात्री ९.४५ वाजता धाड टाकली. मनोहर तरारे यांच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील एका खोलीत ऑनलाईन मोबाईलवर सट्टा सुरू होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा  :  सध्याचे युग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे अवैध धंद्यातही या तंत्रज्ञानाचा व आधुनिक उपकरणांचा उपयोग करून गैरमार्गाने कोट्यवधीची माया जमविली जात आहे. शहरात ऑनलाईन मोबाईल सट्टा जोमात सुरू आहे. तिरोड्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्ड्यावर धाड घालून चार आरोपींना अटक केली आहे. तर ३० लाख ९ हजार ४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २६ ऑक्टोबरच्या रात्री ९.४५ वाजता करण्यात आली.गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी तिरोडाच्या शास्त्री वॉर्डात सुरू असलेल्या ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्ड्यावर धाड घातली. शास्त्री वॉर्डातील मनोहर तरारे यांनी आपल्या घरी घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावून, घराच्या समोरील दाराला बाहेरून कुलूप लावून वरच्या माळ्यावर ऑनलाईन मोबाईलवर सट्टा लावून जुगार खेळवित होता. या माहितीवरून पंचाच्या समक्ष २६ ऑक्टोबरच्या रात्री ९.४५ वाजता धाड टाकली. मनोहर तरारे यांच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील एका खोलीत ऑनलाईन मोबाईलवर सट्टा सुरू होता. तेथे सट्ट्याचे आकडे लिहून जुगार खेळताना चार आरोपी मिळाले. आरोपींमध्ये मनोहर श्रीराम तरारे (४४) रा. शास्त्री वॉर्ड तिरोडा, सुरेश चमरु घोडमारे (४०) रा. संत कवरराम वॉर्ड तिरोडा, डेव्हिड रविकिरण बडगे (२७) रा. आंबेडकर वॉर्ड तिरोडा व संदीप चरणदास गजभिये (३८) रा.महात्मा फुले वॉर्ड तिरोडा यांचा समावेश आहे. या कारवाईत ६ लाख ५३ हजार ९०० रुपये रोख, १६ नग विविध कंपनीचे मोबाईल किंमत १ लाख ८१ हजार रुपये व इतर साहित्य असा ३० लाख ९ हजार ४१२ रुपयांचा माल जप्त केला आहे.

 

टॅग्स :onlineऑनलाइन