शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

धनाढ्यांनीच थकविला कर

By admin | Updated: February 7, 2016 02:31 IST

साडेनऊ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सर करण्यासाठी गोंदिया नगर परिषदेची कसरत सुरू झाली आहे.

९.५० कोटींच्या वसुलीचा डोंगर : ‘टॉप टेन’ शासकीय संस्थांकडे ५० लाखांची थकबाकीकपिल केकत  गोंदियासाडेनऊ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सर करण्यासाठी गोंदिया नगर परिषदेची कसरत सुरू झाली आहे. मात्र यातील सर्वाधिक रक्कम शहरातील नामवंत धनाढ्यांकडे थकित असल्याचे पालिकेकडील आकडेवारीतून दिसून येते. कर थकबाकी ठेवण्यात शासकीय संस्थाही मागे नाहीत. त्यांच्याकडे ५० लाख ५४ हजार रुपयांचा कर थकित आहे. याशिवाय कर न भरणाऱ्या शहरातील १० धनाढ्यांकडे ३२ लाख ८२ हजारांची थकबाकी आहे. आता दोन महिन्यात ही वसुली करण्यात पालिकेला कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कर वसुलीच्या बाबतीत येथील पालिकेची दैनावस्था सर्वश्रुत आहे. यासाठी शहरवासीयांची मानसिकता म्हणा किंवा कर वसुलीच्या कामात येत असलेला राजकीय अडसर म्हणा, कर वसुली पाहिजे तशी होत नाही. परिणामी कर वसुलीचा आकडा सहजासहजी कमी होत नसल्याचे दिसून येते. यंदा पालिकेला सुमारे साडेनऊ कोटींची कर वसुली करायची असून या रकमेतील सर्वाधिक रक्कम शहरातील नामवंत धनाढ्यांकडेच असल्याची माहिती आहे. या धनाढ्यांमध्ये काही नगर परिषद पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील वसुली नगर परिषद करेल की त्यांना विशेष सूट दिली जाईल, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.मागील वर्षी नगर परिषदेने कंबर कसून कर वसुली मोहीम हाती घेतली होती. तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनीही यात भाग घेतल्याने ५० टक्केच्यावर कर वसुली करण्यात पालिका यशस्वी ठरली होती. यामुळेच मागील वर्षी ११ कोटींच्या घरात असलेला आकडा यंदा साडे नऊ कोटींवर आला आहे. मात्र ही वसुली करण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी नगर परिषदेला कडक पावले उचलत मोहिमेला गती द्यावी लागणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ७५ टक्के वसुलीचे टार्गेट जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पालिकेला यंदा ७५ टक्के कर वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांनी गुरूवारी कर वसुली विभागाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मागील वर्षी केलेल्या नियोजन व कारवाईबाबत जाणून घेतले. त्यानुसार त्यांनी कर वसुलीत उतरण्याची हमी दर्शविली. तसेच कर वसुलीसाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांना घेऊन तयार केलेल्या पथकाला सोमवारपासून (दि.८) कर वसुली मोहिमेत उतरण्याचे आदेश दिले आहेत. बाजार समितीकडील थकबाकीचे भिजत घोंगडे शहरातील मुख्य थकबाकीदारांच्या यादीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सर्वाधिक ४७ लाख ३८ हजार ३६९ रूपयांची थकबाकी नोंद आहे. मात्र बाजार समितीच्या ६२ खोल्या व २० झोपड्यांत पालिकेचे सफाई कामगार राहात असून त्यांच्यावर सन २००३-०४ पासूनचे भाडे थकून आहे. यामुळे बाजार समितीने हिशेब करण्याची मागणीही केली होती. मात्र आतापर्यंत हा हिशेब न झाल्याने यंदाही पालिकेच्या यादीत बाजार समितीच्या नावाने ही रक्कम दिसून येत आहे.