लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : बरेचदा वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पैसे मोजून देखील रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. लोकांमध्ये अद्यापही रक्तदानाप्रती व्यापक प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली नाही. त्यामुळे कुठल्या रुग्णांचा जीव रक्ताअभावी जावू नये त्यांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच रक्तदानाबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावे आणि गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे याच हेतूने रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे प्रतिपादन अदानी प्रकल्पाचे स्टेशन हेड सी.पी.साहू यांनी केले.येथील अदानी विद्युत प्रकल्पाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले करण्यात आले. या वेळी ते बोलत होत. शिबिरात १०८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी अदानी पावर प्रमुख सी.पी.साहू, आॅपरेशन अॅन्ड मेन्टनन्स हेड अरिंदम चॅटर्जी, एच.आर.विभाग प्रमुख हरिप्रसाद अडथळे, डॉ.लावणकर व सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरासाठी विविध ठिकाणाहून रक्तपेढी चमू बोलाविण्यात आल्या होत्या.थॅलेसेमिया परिवार रक्तपेढी गोंदिया, लोकमान्य रक्तपेढी गोंदिया, साईनाम रक्तपेढी नागपूर, डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर, लाईफलाईन रक्तपेढी नागपूर, जिवनज्योती रक्तपेढी नागपूर व आयुष रक्तपेढी नागपूर या सर्व चमूंनी रक्तसंकलन केले.अदानी विद्युत प्रकल्पातील सर्व अधिकरी, कर्मचारी असे एकूण १०८४ जणांनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी डॉ. रवी लावणकर, एच.आर.विभाग, अदानी फाऊंडेशनसह सर्व विभाग प्रमुखांनी सहकार्य केले. सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल अदानी पावर प्रमुख सी.पी.साहू यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी एच.आर. विभाग सर्व विभागप्रमुखासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:18 IST
बरेचदा वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पैसे मोजून देखील रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. लोकांमध्ये अद्यापही रक्तदानाप्रती व्यापक प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली नाही.
गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे
ठळक मुद्देसी.पी.साहू : १०८४ रक्तदात्यांनी केले रक्तदान, अदानी प्रकल्पाचा उपक्रम