शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या अपत्याच्या वेळी मिळणार ५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:07 IST

बाल आणि माता मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे.

ठळक मुद्देलाभासाठी कोणतीही अट नाही : ६ हजार ३१३ महिलांचे होणार मातृवंदन

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाल आणि माता मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे. मात्र यानंतरही मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता गर्भवतींना पहिल्या अपत्यासाठी शासनाने मातृ वंदन योजनेतंर्गत ५ हजार रूपयांचे अनुदान देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी. त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात ५ हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला/स्तनदा मातेस ५ हजार रूपये पंतप्रधान मातृ वंदन योजनेतून दिले जात आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीे हा अनुसूचित जाती, जमातील व द्रारिद्रय रेषेखालील असावा अशी कोणतीही अट नाही. पहिल्या अपत्यासाठी नोकरदार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मात्र अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या व्यतिरीक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठी पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक, पोस्ट खात्यावर (डीबीटी) ही रक्कम जमा होणार आहे. लाभार्थीचे खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे. १ जानेवारी २०१७ पासून गरोदर महिलांना लाभ देण्यात येणार आहे. (म्हणजे लसीकरण कार्ड वरील एलएमपी १ जानेवारी २०१७ किंवा पुढची असावी) सदर लाभ घेण्यासाठी लसीकरण कार्ड (एलएमपी) महत्वाचे आहे.असा मिळणार लाभगर्भवतीच्या नोंदणीच्यावेळी १००० रूपये देण्यात येईल. गर्भवती होण्याच्या १५० दिवसात नोंदणी करणे आवश्यक आहे. गरोदरपणाला सहा महिने पूर्ण होताच २००० रूपये देण्यात येतील. त्यासाठी किमान एक तपासणी करणे आवश्यक आहे. प्रसूतीपश्चात बालकाची जन्मनोंद व पेंटाव्हॅलन्ट ३ रा डोज दिल्यानंतर (१४ आठवडे) लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसºया टप्यातील २००० रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.६३१३ महिला पात्र१ जानेवारी २०१७ पासून गर्भवती झालेल्या महिलांपैकी जी महिला पहिल्यांदाच गर्भवती झाली त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात एप्रिल ते आॅक्टोबर या दरम्यान गोंदिया जिल्ह्यात १२ हजार १६ महिला गर्भवती असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यातील ६ हजार ३१३ महिला पहिल्यांदाच गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.शासनाने यासंदर्भात आढावा घेतला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. लवकरच कार्यवाही करून या योजनेचा लाभ शासनाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.डॉ. श्याम निमगडेजिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गोंदिया.