शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

‘टिल्लूं’नी वाढविले टेंशन

By admin | Updated: May 17, 2016 01:35 IST

पाण्यासाठी हाहाकार माजला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गोंदियात अनेक वर्षानंतर एक वेळा पाणी

गोंदिया : पाण्यासाठी हाहाकार माजला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गोंदियात अनेक वर्षानंतर एक वेळा पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. मात्र कमी वेळासाठी होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून पुरेसे पाणी मिळावे म्हणून अर्धेअधिक नळधारक टिल्लूपंपांनी पाणी खेचत आहेत. परिणामी अनेक जणांना, विशेषत: उंच भागातील रहिशांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण याला आळा घालण्यात हतबल दिसून येत आहे. जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटत चालल्यामुळे पाणी टंचाईची समस्या गडद झाली आहे. आता जेमतेम मे महिना सुरू असून एक महिनातरी पाऊस जोर धरणार नाही. त्यामुळे एवढे दिवस नागरिकांना पाणी पुरवठा करता यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे शहरवासीयांना ठरवून दिलेल्या वेळात पाणी भरून ठेवावे लागत आहे. मात्र सर्वच नळ कनेक्शन धारकांना पाणी मिळत नसल्याचेही चित्र बघावयास मिळत आहे. याचे कारण असे की, शहरात असलेल्या नळ कनेक्शनधारकांमधील बहुतांश नळधारकांकडे आज टुल्लूपंप असून ते पंपद्वारे पाणी खेचून घेत आहेत. परिणामी ज्यांच्याकडे टुल्लूपंप नाही अशांपर्यंत पाणी पोहचू शकत नाही. यामुळे त्यांना थोडेफार पाणीच मिळत आहे. याबाबत अशा नागरिकांकडून तक्रार केली जात आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून या प्रकारावर कारवाई शून्य दिसून येत आहे. मजीप्राच्या या भूमिकेमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना कोरड्या घशानेच राहावे लागण्याची गत आली आहे. (शहर प्रतिनिधी)पुरवठा काळात भारनियमन करा४टिल्लू पंपाद्वारे पाणी खेचण्याचा हा प्रकार जोमात सुरू असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सोमवारी (दि.१६) पाणी पुरवठा काळात भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी महावितरणला तसे निर्देश दिल्याची माहिती मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली. मात्र महावितरण त्यावर कधी अंमलबजावणी करते यावर बरेच काही अवलंबून आहे.४शहरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे १२०७४ कनेक्शनधारक आहेत. एक अंदाज लावला असता यातील अर्ध्याधीकांकडे टुल्लूपंप आहे. नळाव्दारे येत असलेल्या पाण्याला फोर्स राहत नसल्यामुळे शिवाय नळ कधी येणार नाही याचा नेम नसल्याने हे टुल्लूपंपधारक पंपलावून पाईपलाईनमधील पाणी खेचून साठवून ठेवतात. त्यांचा हा प्रकार मात्र गरिबांना पाण्यासाठी तडफडत सोडून देत आहे. या काळात मजीप्राने शोध मोहीम राबविणे गरजेचे होते. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्याने प्रत्येक भागात जाणे शक्य नाही. मात्र तक्रार आल्यावर यासंदर्भात नक्कीच कारवाई केली जाईल. शिवाय पोलिसांतही तक्रार नोंदवून कारवाई करणार आहोत. - राजेंद्र मडके उपविभागीय अभियंता, मजीप्रा.