शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीनिमित्त महिलांना ‘तिळाची’ भेट

By admin | Updated: January 10, 2016 02:04 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव घसरल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे.

यावर्षी भाव घसरले : गोडवा वाढल्याने खरेदीसाठी वाढली गर्दी गोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव घसरल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे. जेमतेम चार दिवसांवर आलेल्या संक्रातीनिमित्त तीळ खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे यंदा तिळाचे लाडू बिनधास्त खाता येणार असल्याचे दिसते. ‘तिळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तिळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ््यापुढे येतात ते तिळाचे लाडू. मात्र तिळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तिळाचे लाडू बिनवितानाही बजेटवर नजर ठेवावा लागते. यंदा मात्र तिळाचे विक्रमी उत्पादन झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत तिळाचे भाव काही प्रमाणात उतरले असून महिलांना दिलासा मिळाला आहे. संक्रात आली की तिळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता जेमतेम चार दिवसांवर संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते. हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तिळ व गूळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव कमी असल्याने थोडे जास्त लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)१०० रुपये किलोगोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे तीळ १२० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ १०० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ४० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. यंदा मात्र तिळाचे चांगले उत्पादन झाल्याने तीळाचे भाव घसरले आहे. मागील वर्षी हेच पांढरे तीळ २५० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ २०० रूपये दराने विकल्याचेही विक्रेत्या बिरजूलाबाई निखाडे यांनी सांगितले. रेडिमेड पापडीही उपलब्धआजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडीमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पापडीही रेडीमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनाच तीळ खरेदी करून त्याचे लाडू व पापडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडीमेड पापडीकडे असतो. नेमकी ही बाब हेरून बाजारात रेडीमेड पापडी उपलब्ध करण्यात आली आहे. २४० रूपये किलो दराने ही पापडी सध्या विकली जात आहे.बाजारात काटीचे तीळयेथील बाजारात मोठ्या प्रमाणात तालुक्यातील ग्राम काटी येथील तीळ व गुळ विक्रीसाठी आले आहे. तालुक्यातील ग्राम काटी येथे तिळाचे उत्पादन घेतले जात असून उसाचीही मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याने तेथेच गुळही तयार केला जातो. काटी येथीलच महिला त्यांच्याकडील किंवा गावातीलच शेतकऱ्यांकडून तीळ खरेदी करून गोंदियात विक्रीसाठी दुकाने लावत असल्याचेही विक्रेत्या महिलांनी सांगीतले.