शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मलकाझरी परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज

By अंकुश गुंडावार | Updated: March 28, 2025 20:04 IST

वाघाचा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या असल्याने त्याचा पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

गोंदिया : देवरी तालुक्यातील चिचगड वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या मलकाझरी कक्ष क्रमांक ८०२ मध्ये कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. वाघाचा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या असल्याने त्याचा पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

चिचगड वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या मलकाझरी कक्ष क्रमांक ८०२ परिसरात वनरक्षक शुक्रवारी दुपारी गस्त घालत असताना एका पाणवठ्याजवळ कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला. त्यांनी लगेच याची माहिती वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांना व वन अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली.

वाघाचा मृतदेह हा पुर्णपणे कुजलेल्या होता. त्याच्या गळ्याजवळ काही खूणा आढळल्या. तसेच या वाघाला मारल्यानंतर त्याला पाचशे मीटरपर्यंत फरफटत पाणवठ्याजवळ नेण्यात आल्याची बाब परिसरातील खूणावरुन पुढे आली. एकंदरीत दोन वाघांच्या झुंझीमध्येच या वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या वाघाचा मृत्यू पाच सहा दिवसांपुर्वी झाला असल्याचे मृतदेहाच्या स्थितीवरुन आढळले. विशेष म्हणजे मृतदेह पुर्णपणे कुजलेला असल्याने त्याचे शवविच्छेदन सुध्दा करता आले नाही अथवा नमुने सुध्दा तपासणीसाठी घेता आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.ट्रॅप कमेऱ्यांची मदत घेणारज्या ठिकाणी वाघाचा मृतदेह आढळला त्या परिसरात एखाद्या वाघाचा वावर असण्याची शक्यता आहे. त्याच वाघासह झालेल्या झुंझीत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मलकाझरी कक्ष क्रमांक ८०२ मध्ये ट्रॉप कॅमेरे लावले असून त्यांची तपासणी करुन या वाघाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्यात येणार असल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.