लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे गुरूवार आणि शुक्रवारी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही दिवस उमेदवारी अर्ज‘वार’ ठरणार आहेत.जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा क्षेत्रापैकी भाजपने अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले, तिरोडा विजय रहांगडाले आणि देवरी मतदारसंघातून संजय पुराम या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली.तर गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या उमेदवाराचे नाव देखील निश्चित झाले आहे. काँग्रेसने आमगाव विधानसभा मतदारसंघातून सहषराम कोरोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.त्यातच तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून आमगाव आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असल्याचे बुधवारी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसकडून उर्वरित उमेदवारांच्या नावाची घोषणा गुरूवारी होणे निश्चित आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना आपला जनाधार दाखविण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले जाणार असून यासाठी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे संदेश पाठविले जात आहे. तर कार्यकर्त्यांची जुळवा जुळव करण्याचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे.आता उमेदवारी दाखल करण्यासाठी गुरूवार आणि शुक्रवार हे शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत.त्यामुळे या दोन दिवसात चारही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक आणि पोलीस विभागाने सुध्दा आवश्यक उपाय योजना केल्या आहेत.भाजपमध्ये बंडखोरी अटळगोंदिया विधानसभा क्षेत्रात पक्षाने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.गुरूवारी ते आपल्या समर्थकांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी अटळ आहे.अग्रवाल यांना पक्षातील काही जेष्ठांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याची माहिती आहे.चंद्रिकापुरे,बन्सोड जवळपास निश्चित?गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी आघाडीत तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत.अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून मनोहर चंद्रिकापूरे तर तिरोडा मतदारसंघातून दिलीप बन्सोड यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र याची अधिकृत घोषणा ही गुरूवारी होणार आहे.आमगाव मतदारसंघात बंडखोरीची शक्यताआमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आ.रामरतन राऊत यांनी उमेदवारी मागीतली होती. मात्र पक्षाने सहषराम कोरोटे यांना उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे राऊत हे नाराज असून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे.मात्र अद्याप त्यांच्याकडून याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.कार्यकर्त्यांना आले महत्त्वसर्वच राजकीय पक्षांनी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन केले जाणार असून एकाच वेळी कार्यकर्त्ये गोळा करायचे कसे असा प्रश्न उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढल्याचे चित्र आहे.
गुरूवार,शुक्रवार ठरणार उमेदवारी अर्ज ‘वार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 6:00 AM
जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा क्षेत्रापैकी भाजपने अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले, तिरोडा विजय रहांगडाले आणि देवरी मतदारसंघातून संजय पुराम या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली.तर गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या उमेदवाराचे नाव देखील निश्चित झाले आहे. काँग्रेसने आमगाव विधानसभा मतदारसंघातून सहषराम कोरोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
ठळक मुद्देदिग्गज उमेदवार करणार शक्ती प्रदर्शन, केवळ दोन दिवस शिल्लक : आज होणार चित्र स्पष्ट